वयाच्या 67व्या वर्षीही अनिलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन ; 'फायटर'साठी कमी केलं 15 किलो वजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 14:13 IST2024-01-08T14:11:40+5:302024-01-08T14:13:20+5:30
Anil kapoor: फायटर या सिनेमात अनिल कपूर महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.

वयाच्या 67व्या वर्षीही अनिलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन ; 'फायटर'साठी कमी केलं 15 किलो वजन
बॉलिवूडचा 'मिस्टर इंडिया' म्हणजेच सुपरस्टार अनिल कपूर(Anil kapoor) याचं नाव कायम बॉलिवूडच्या सर्वात फिट अभिनेत्यांमध्ये घेतलं जातं. वयाची ६७ वर्ष ओलांडल्यानंतरही अनिलचा फिटनेस वाखाणण्याजोगा आहे. इतंकच नाही तर त्याचा फिटनेस २० वर्षाच्या तरुणाला लाजवेल असाच आहे. अनिल लवकरच फायटर या सिनेमात झळकणार आहे. त्यामुळे या सिनेमासाठी तो प्रचंड मेहनत करत असून या वयातही त्याने तब्बल १५ किलो वजन कमी केलं आहे.
सध्या सोशल मीडियावर अनिल कपूर यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्यांचं जबरदस्त ट्रान्सफर्मेशन केलेला लूक दिसून येत आहे. फायटर या सिनेमात अनिल कपूर ४५ वर्षीय व्यक्तीची भूमिका साकारत असून या भूमिकेला न्याय देण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे.
दरम्यान, या सिनेमात अनिल कपूर हवाई दल अधिकारी राकेश जय सिंह ऊर्फ रॉकी यांची भूमिका साकारत आहेत. हा सिनेमा येत्या २५ जानेवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात त्यांच्यासोबत ऋतिक रोशन, दिपिका पदुकोण, करण सिंह ग्रोवर, अक्षय ओबेरॉय, संजिदा शेख, तलत अजीज यांसारखे कलाकार झळकणार आहेत.