​साठीचा अनिल कपूर ‘फिट’ होण्यासाठी वापरतोय ‘ही’ कमालीची थेरपी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 07:48 AM2017-09-20T07:48:53+5:302017-09-20T13:18:53+5:30

अनिल कपूरचे वय वाढतेय पण या वाढत्या वयाचा कुठलाच परिणाम त्याच्यावर होताना दिसत नाहीय. खरे तर अनिलने साठी ओलांडलीय, ...

Anil Kapoor is using 'Fit' to become 'Fit'! | ​साठीचा अनिल कपूर ‘फिट’ होण्यासाठी वापरतोय ‘ही’ कमालीची थेरपी!

​साठीचा अनिल कपूर ‘फिट’ होण्यासाठी वापरतोय ‘ही’ कमालीची थेरपी!

googlenewsNext
िल कपूरचे वय वाढतेय पण या वाढत्या वयाचा कुठलाच परिणाम त्याच्यावर होताना दिसत नाहीय. खरे तर अनिलने साठी ओलांडलीय, पण त्याचा उत्साह नव्यांना लाजवणारा आहे. नव्या दमाचे अभिनेते करतात, त्यापेक्षा कितीतरी अधिक काम अनिल कपूर करतोय. काही दिवसांपूर्वी अनिलचा ‘मुबारकां’ रिलीज झाला आणि सध्या अनिल ‘फन्ने खान’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. याशिवाय आणखी एक गोष्ट अनिल करत सुटलाय. होय, अनिलने त्याचा एक ताजा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो अनिलच्या फिटनेसमागचे गुपित उघड करणारा आहे. या फोटोत अनिल स्वीमिंग करतोय. ‘पायाला झालेल्या दुखापतीमुळे एक चांगली गोष्ट कुठली घडली असेल तर ती म्हणजे स्वीमिंग करणे किती मजेदार आहे, हे मला कळले. शरिर व मेंदूसाठी ही कमालची थेरेपी आहे,’ असे tweet त्याने केले आहे.


काही दिवसांपूर्वी एका चित्रपटाच्या शूटींगदरम्यान अनिल जखमी झाला होता. त्यात त्याच्या पायाला इजा झाली. त्यामुळे त्याला फिजिओथेरपीचा आधार घ्यावा लागला होता. यादरम्यान अनिल स्वीमिंग आणि पूल थेरपी घेत आहे. 
‘फन्ने खान’ या चित्रपटात अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय लीड भूमिकेत दिसणार आहेत. अलीकडे या चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी झाला. अनिल या चित्रपटात ‘सॉल्ट अ‍ॅण्ड पेपर’ लूकमध्ये दिसणार आहे. या लूकसाठी अनिल कपूर जे काही केले, ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल. या लूकसाठी अनिलला बरीच मेहनत घ्यावी लागलीयं. सलग पाच दिवस १०-१० दहा तास सलूनमध्ये घालवावे लागलेत.  या दहा दिवसांत त्याच्या भूमिकेचा लूक ठरवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले गेलेत. अनेक तास खर्ची घातल्यानंतर अखेर त्याचा हा लूक फायनल झाला.  चित्रपटातील अनिलचा लूक एकदम दमदार आहे.

ALSO READ : पहिल्यांदाच पप्पा अनिल कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार हर्षवर्धन कपूर!!

बॉलिवूडमधील सर्वाधिक फिटनेस फ्रीक म्हणून ओळखल्या जाणा-या अनिलने या चित्रपटासाठी वजनही कमी केले. यासाठी आपल्या डेली फिटनेस रूटीनमध्ये त्याला काही बदल करावे लागले. यानंतर भूमिकेसाठी लागणाºया शेपमध्ये यायला त्याला चार आठवडे लागले. तूर्तास बॉलिवूडच्या अनेक यंग अ‍ॅक्टर्सला लाजवणाºया अनिलच्या या लूकची बरीच प्रशंसा होतेयं. 

Web Title: Anil Kapoor is using 'Fit' to become 'Fit'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.