अनिल कपूरची ‘ही’ कृती बघताच घाबरले होते नेल्सन मंडेला, वास्तव जाणून घेताच घेतली गळाभेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2017 11:35 AM2017-12-02T11:35:58+5:302017-12-02T17:05:58+5:30

झक्कास अभिनेता अनिल कपूर बॉलिवूडचा असा कलाकार आहे, ज्याच्या वाढत्या वयाचा अंदाज बांधणे मुश्कील आहे. वयाच्या ६० व्या वर्षीही ...

Anil Kapoor was afraid of seeing this 'Nelson Mandela', realization of reality! | अनिल कपूरची ‘ही’ कृती बघताच घाबरले होते नेल्सन मंडेला, वास्तव जाणून घेताच घेतली गळाभेट!

अनिल कपूरची ‘ही’ कृती बघताच घाबरले होते नेल्सन मंडेला, वास्तव जाणून घेताच घेतली गळाभेट!

googlenewsNext
्कास अभिनेता अनिल कपूर बॉलिवूडचा असा कलाकार आहे, ज्याच्या वाढत्या वयाचा अंदाज बांधणे मुश्कील आहे. वयाच्या ६० व्या वर्षीही त्याच्यात यंगस्टर्सप्रमाणे एनर्जी आहे. त्यामुळे आजही त्याचा अभिनय प्रेक्षकांना भावतो. असो, आज आम्ही तुम्हाला अनिल कपूरशी संबंधित एका मजेशीर किस्सा सांगणार आहोत. हा किस्सा इंडस्ट्रीशी संबंधित नसून, दक्षिण आफ्रिकेचे माजी दिवंगत राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांच्याशी निगडित आहे. होय, जेव्हा अनिल कपूर पहिल्यांदा नेल्सन मंडेला यांना भेटला होता तेव्हा त्याने मंडेला यांच्यासमोर असे काही कृत्य केले की, ते अनिल कपूरला अक्षरश: घाबरले होते. 

२००७ मध्ये रिलीज झालेल्या ‘गांधी माय फादर’ हा चित्रपट अनिल कपूरने प्रोड्यूस केला होता. या चित्रपटासंबंधी त्याला २००५ मध्ये आफ्रिकेला जावे लागले. त्याठिकाणी अनिलची भेट तेथील मंत्री युसुफ प्रहर यांच्याशी झाली होती. त्यावेळी अनिल कपूरने त्यांना म्हटले होते की, मला नेल्सन मंडेला यांना भेटण्याची इच्छा आहे. तसेच ही भेट घडवून आणण्यासाठी तुम्ही मदत करा, अशी मागणीही अनिलने युसुफ यांच्याकडे केली. युसुफ यांनी अनिलची ही मागणी पूर्ण करण्यासाठी १३ जुलै २००५ रोजी भेटण्याची वेळ निश्चित केली. अनिल त्याच्या काही सहकाºयांबरोबर नेल्सन मंडेला यांना भेटण्यासाठी गेला. जेव्हा अनिल नेल्सन मंडेला यांच्यासमोर गेला तेव्हा त्यांच्या पाया पडण्यासाठी खाली झुकला. परंतु अनिलची ही कृती नेल्सन मंडेला यांच्या बहुधा लक्षात आली नसल्याने ते घाबरले अन् मागे झाले. त्यांनी म्हटले की, ‘हा असे का करत आहे?’



तेव्हा अनिल नेल्सन मंडेला यांच्याकडे गेला अन् त्याने जे त्यांना सांगितले ते ऐकून त्यांनी अनिलला शेकहॅण्ड केले नाही तर त्याच्या गळ्यात पडले. अनिलने नेल्सन मंडेला यांना सांगितले होते की, आम्ही भारतीय जेव्हा एखाद्या मोठ्या व्यक्तीला भेटतो तेव्हा आम्ही त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांचे चरण स्पर्श करतो. अनिलचे हे शब्द ऐकून नेल्सन मंडेला खूपच प्रभावित झाले होते.

Web Title: Anil Kapoor was afraid of seeing this 'Nelson Mandela', realization of reality!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.