​अनिल कपूर लवकरच दिसणार वेब सिरीजमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2016 08:49 PM2016-11-25T20:49:47+5:302016-11-25T20:49:47+5:30

वेगवेगळ्या भूमिका करून आपली खास ओळख निर्माण करणारा बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर लवकरच अभिनयाच्या डिजीटल दुनियेत प्रवेश करणार आहे. ...

Anil Kapoor will soon be seen in the web series | ​अनिल कपूर लवकरच दिसणार वेब सिरीजमध्ये

​अनिल कपूर लवकरच दिसणार वेब सिरीजमध्ये

googlenewsNext
ong>वेगवेगळ्या भूमिका करून आपली खास ओळख निर्माण करणारा बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर लवकरच अभिनयाच्या डिजीटल दुनियेत प्रवेश करणार आहे. मायकल फाबेर यांच्या बेस्टसेलर बुक आॅफ स्ट्रेंज न्यू थिंग या पुस्तकावर आधारित एका सायन्स फिक्शन वेब सिरीजमध्ये अनिल कपूर महत्त्वाची भूमिका साकारताना दिसेल. 

ही वेब सिरीजमध्ये अंतराळात मानवी वस्त्या निर्माण करण्याच्या विषयावर आधारित आहे. या वेब सिरीजमध्ये अनिल कपूर डॉ. विक्रम दिनेश नामक भूमिका करीत असून, तो या प्रोजेक्टचा प्रमुख आहे. अंतराळात मानव वस्त्या निर्माण करण्याची जबाबदारी तो सांभाळताना दिसेल.

या वेबसिरीजबद्दल माहिती देताना अनिलकपूर म्हणाला, याबाबत मी सध्या तुम्हाला फारशी माहिती देऊ शकत नाही. पण मी या प्रोजेक्टसाठी उत्साहित आहे. ही वेब सिरीज अनेक बाबतीत पहिली ठरणारी आहे. डिजीटल दुनियेत अनेक नव्या गोष्टी होत आहेत. संपूर्ण जग डिजीटलच्या माध्यमातून एक होताना दिसत आहे. हे मनोरंजनाचे भविष्य आहे. मी वेब सिरीजमध्ये काम करण्यास उत्सुक होतो. या भूमिकेबद्दल जेव्हा मला विचारण्यात आले, तेव्हा या संधीचा फायदा घेत मी होकार कळविला. 

Anil Kapoor play important role in sci-fi web series

या वेब सिरीजमध्ये तो एचबीओवर प्रसारित झालेल्या ‘गेम आॅफ थ्रोन्स’ मधील रिचर्ड मॅटन सोबत दिसेल. या वेबसिरीजचे लेखन ‘ब्रिज आॅफ स्पेशिस’चे लेखक मॅट चेअरमन यांनी केले असून, २००५ साली आलेल्या ‘द लास्ट किंग आॅफ स्कॉटलंड’चे दिग्दर्शक केविन मॅकडोनाल्ड करणार आहे. पुढील वर्षी ही वेबसिरीज प्रदर्शित केली जाणार आहे. 

मानवाचे भविष्य कसे असेल हे सांगणे कठीण असले तरी अनिल कपूर अभिनीत वेब सिरीजमधून त्याची कल्पना नक्कीच केली जाऊ शकते. 

Anil Kapoor play important role in sci-fi web series

Web Title: Anil Kapoor will soon be seen in the web series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.