अनिल कपूरला लोक म्हणायचे, ‘सुकळ्या चेहऱ्याचा, मोठ्या केसांचा अन् बारक्या पायांचा हीरो कसा होईल?’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 12:42 PM2017-10-04T12:42:17+5:302017-10-04T18:13:17+5:30

बॉलिवूडचा झक्कास अभिनेता अनिल कपूर आजही तेवढ्याच एनर्जीने इंडस्ट्रीत सक्रिय आहे. एकीकडे यंगस्टर्सचा जमाना असताना अनिल कपूरमधील हुरूप बघण्यासारखा ...

Anil Kapoor would say, 'How will the face of a dry face, a big hair, and a ball of twelve feet?' | अनिल कपूरला लोक म्हणायचे, ‘सुकळ्या चेहऱ्याचा, मोठ्या केसांचा अन् बारक्या पायांचा हीरो कसा होईल?’

अनिल कपूरला लोक म्हणायचे, ‘सुकळ्या चेहऱ्याचा, मोठ्या केसांचा अन् बारक्या पायांचा हीरो कसा होईल?’

googlenewsNext
लिवूडचा झक्कास अभिनेता अनिल कपूर आजही तेवढ्याच एनर्जीने इंडस्ट्रीत सक्रिय आहे. एकीकडे यंगस्टर्सचा जमाना असताना अनिल कपूरमधील हुरूप बघण्यासारखा आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘मुबारका’ हा चित्रपट रिलीज झाला होता. चित्रपटात अनिलचा अंदाज बघण्यासारखा होता. कदाचित त्यामुळेच या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगला गल्ला जमविला. सध्या अनिल ऐश्वर्या रायसोबत एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. असो, आज आम्ही तुम्हाला अनिलच्या आयुष्यातील एक किस्सा सांगणार आहोत. हा किस्सा खूपच रंजक असा आहे. कारण अनिल वारंवार दहाव्या मजल्यावर चढायचा पण का? याचाच खुलासा आज आम्ही करणार आहोत. 

हा किस्सा तेव्हाचा आहे जेव्हा त्याला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. अनिलने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘त्याकाळी चित्रपटात काम करणे म्हणजे लोकांना मूर्खपणाचे वाटायचे. माझ्याबाबतीत लोकांचा स्पष्ट समज होता की, मी कधीही अभिनेता बनू शकणार नाही. बाहेरच काय तर घरातही अशीच परिस्थिती असल्याने घरात डायलॉग रिहर्सल करणे मुश्किल व्हायचे. त्यामुळे डायलॉग रिहर्सल करण्यासाठी मी घरापासून दूर एका बिल्डिंगच्या दहाव्या मजल्यावर जात होतो.’



पुढे बोलताना अनिल कपूरने सांगितले की, ‘माझा हा रोजचा उपद्व्याप बघून लोक मला वेडा समजायचे. लोक म्हणायचे की, हा सडपातळ बांध्याचा, मोठमोठ्या केसांमध्ये छोटेसे तोंड असलेला आणि सुकळ्या पायचा मुलगा कसा काय हीरो बनू शकतो? मात्र माझ्यात एक जोश होता. मी घरात बसून जोरजोरात ओरडून डायलॉग पाठ करू शकत नव्हतो. त्यामुळे मी माझ्या आजोबाबरोबर फिरायला जायचे कारण सांगून त्या दहाव्या मजल्यावर जायचो. त्या परिसरात कोणीच राहात नसल्याने मला रिहर्सल करणे सोपे व्हायचे.’

अनिल कपूरचा हा किस्सा खरोखरच त्याच्यातील अभिनयाप्रती असलेला लगाव सांगणारा आहे. असो, त्याकाळी अनिलला जे कष्ट घ्यावे लागले, ते आज यशस्वी होताना दिसत आहेत. कारण अनिल कपूरला यशस्वी अभिनेत्यांच्या यादीमध्ये गणले जाते. अनिलचा आतापर्यंतचा अभिनयाचा प्रवास खरोखरच कौतुकास्पद म्हणावा लागेल. 

Web Title: Anil Kapoor would say, 'How will the face of a dry face, a big hair, and a ball of twelve feet?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.