आर्थिक तंगीत सापडलाय अनिल कपूरचा डुप्लिकेट, जेवणासाठीदेखील नाहीत पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 13:09 IST2020-04-17T13:08:52+5:302020-04-17T13:09:41+5:30
कोरोनाच्या संकटामुळे अनिल कपूरचा डुप्लिकेट आरिफ खान अडचणीत सापडला आहे.

आर्थिक तंगीत सापडलाय अनिल कपूरचा डुप्लिकेट, जेवणासाठीदेखील नाहीत पैसे
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान मांडले आहे. देशातही कोरोना व्हायरसचे संकट वाढत आहे. या व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सगळं काम ठप्प झालं आहे. त्यामुळे अनेक कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. काही जणांकडे उदरनिर्वाहासाठी पैसेदेखील नाही. कोरोनाच्या संकटामुळे अनिल कपूरचा डुप्लिकेट आरिफ खान अडचणीत सापडला आहे. त्यानं आता FWICE कडून मदतीची आशा केली आहे. आरिफ अनिल कपूरच्या अनेक सिनेमात त्याचा बॉडी डबल बनला आहे.
आरिफ खान सध्या आपल्या उदरनिर्वाहासाठी अडचणीत आला आहे. कोरोनामुळे सध्या कोणता इव्हेंट होत नाही. त्यामुळे त्याच्याकडे पैशांचे कोणतंही साधन नाही.
एका मुलाखतीत बोलताना आरिफ म्हणाला, 'माझ्याकडे आता फक्त 3200 रुपये राहिले आहेत. माझी स्थिती एवढी वाईट कधीच झाली नव्हती. मी ठिकठाक कमाई करत असतो. अजून खूप महिने बाकी आहेत आणि मी जास्त पैसे वाचवू शकलेलो नाही. मला माझ्या व्यतिरीक्त माझ्या दोन भावांच्या कुटुंबाकडेही पहावं लागतं. त्यामुळं काम ठप्प असेल तर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो.' असंही त्यानं सांगितलं.
फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) त्याला नक्कीच मदत करतील, अशी आशा आरिफला आहे.