'ॲनिमल'नंतर लाईमलाईटमध्ये आलेल्या तृप्ती डिमरीला करायचंय 'या' साऊथ सुपरस्टारबरोबर काम, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 12:24 IST2023-12-14T12:24:01+5:302023-12-14T12:24:45+5:30
बॉलिवूड नाही तर 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरीने व्यक्त केली साऊथ हिरोसोबत काम करण्याची इच्छा

'ॲनिमल'नंतर लाईमलाईटमध्ये आलेल्या तृप्ती डिमरीला करायचंय 'या' साऊथ सुपरस्टारबरोबर काम, म्हणाली...
'ॲनिमल' सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमात इंटिमेट सीन्स देऊन बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीने लाइमलाइट खेचून घेतलं आहे. 'ॲनिमल'मध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या रश्मिका मंदानापेक्षा तृप्ती डिमरीचीच चर्चा अधिक होत आहे. 'ॲनिमल'मुळे प्रसिद्धीधझोतात आलेली तृप्ती चाहत्यांची नॅशनल क्रश बनली आहे. तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून चाहत्या वर्गातही भर पडली आहे.
'ॲनिमल'नंतर तृप्ती डिमरीला आता अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या आहेत. तृप्तीने अनेक ठिकाणी मुलाखतीही देत आहे. अशाच एका मुलाखतीत तृप्तीने साऊथ हिरोबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बॉलिवूड बबला दिलेल्या मुलाखतीत तृप्तीला "दाक्षिणात्य सिनेसृष्टीत कोणत्या अभिनेत्याच्या चित्रपटातून पदार्पण करायला आवडेल?" असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तृप्तीने सेकंदही न घालवता RRR फेम ज्युनियर एनटीआरचं नाव घेतलं.
दरम्यान, 'ॲनिमल'नंतर तृप्ती मेरे मेहबूब मेरे सनम चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती विकी कौशलबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. राजकुमार रावच्या विकी विद्या का वो वाला व्हिडिओ या सिनेमातही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'ॲनिमल'आधी तृप्तीने अनेक बॉलिवूड सिनेमांत काम केलं आहे. 'कला', 'पोस्टर बॉईज', 'लैला मजनू', 'बुलबूल' या चित्रपटांत ती झळकली आहे.