बॉबी देओलने खरेदी केली शानदार रेंज रोव्हर SUV, किंमत आहे कोटींच्या घरात, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 16:29 IST2025-04-16T16:29:25+5:302025-04-16T16:29:55+5:30
बॉबी देओलने खरेदी केलेली गाडी त्याच्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. या गाडीची किंमत खूप महाग आहे, जाणून घ्या (bobby deol)

बॉबी देओलने खरेदी केली शानदार रेंज रोव्हर SUV, किंमत आहे कोटींच्या घरात, जाणून घ्या
बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल (bobby deol) हा लोकप्रिय अभिनेता. बॉबीच्या करिअरला पुन्हा चांगलीच गती मिळाली आहे. यामागचं कारण म्हणजे बॉबीची भूमिका असलेला आणि २०२३ साली रिलीज झालेला 'अॅनिमल' सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमात बॉबीने अबरारची खलनायकी भूमिका साकारुन चांगलीच छाप सोडली. या सिनेमानंतर बॉबीच्या करिअरची गाडी सुसाट वेगाने पळत आहे. 'अॅनिमल'नंतर बॉबीने दाक्षिणात्य सिनेमांमध्ये खलनायकी भूमिका साकारून साउथ इंडस्ट्रीतही स्वतःच्या अभिनयाचा दबदबा निर्माण केला. अशातच बॉबीने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर एक खास गाडी खरेदी केलीय. त्यामुळे बॉबीची पुन्हा एकदा इंडस्ट्रीत चर्चा झाली आहे.
बॉबीने खरेदी केली शानदार गाडी
बॉबी देओलने शानदार आणि आलिशान रेंज रोव्हर Suv गाडी खरेदी केलीय. बॉबीने खरेदी केलेल्या या शानदार कारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बॉबीची ही नवी आलिशान गाडीची किंमत २.९५ कोटी इतकी आहे. बॉबीने कारसोबत कूल अंदाजात खास फोटोशूट केलं. काळी टोपी, काळा चष्मा लावून बॉबीने कारसोबत खास फोटो काढले. बॉबीला गाड्यांचा शौक असून त्याच्याकडे महागड्या गाड्यांचं कलेश्नन आहे. या कलेक्शनमध्ये बॉबीच्या ताफ्यात ही नवी गाडी समाविष्ट झाली आहे.
बॉबीकडे लॅन्ड रोवर फ्रीलँडर २, रेंज रोवर स्पोर्ट, रेंज रोवर वोग आणि मर्सिडीज बेंज एस क्लास या गाड्या आहेत. त्यामुळे बॉबीने नवी गाडी घेऊन स्वतःची गाड्या खरेदी करण्याची आवड जपली आहे.
बॉबी देओलचं वर्कफ्रंट
बॉबी देओलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, २०२४ मध्ये आलेल्या 'कंगुवा' या साऊथ सिनेमात बॉबी देओल झळकला होता. सध्या बॉबी देओलकडे प्रोजेक्टची रांग आहे. काहीच दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या डाकू महाराज या सिनेमात बॉबी देओल झळकला होता. तो लवकरच 'हरी हरा वीरा मल्लू' या साऊथ सिनेमात औरंगजेबाची भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमात बॉबी देओल खलनायकी भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे बॉबी देओलचं सध्या करिअर सातवे आसमान पर आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.