फुल ऑन Action ड्रामा; रणबीरचा कधीही न पाहिलेला अवतार, पाहा Animal चा धमाकेदार ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 03:09 PM2023-11-23T15:09:08+5:302023-11-23T15:24:57+5:30

साडेतीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये रणबीर आणि अनिल कपूरच्या बाप-बेटा नात्याची बाजू दाखवण्यात आली आहे.

Animal Movie trailer released Ranbir Kapoor and anil kapoor father son relationship is real attraction | फुल ऑन Action ड्रामा; रणबीरचा कधीही न पाहिलेला अवतार, पाहा Animal चा धमाकेदार ट्रेलर

फुल ऑन Action ड्रामा; रणबीरचा कधीही न पाहिलेला अवतार, पाहा Animal चा धमाकेदार ट्रेलर

Animal Trailer: रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) बहुप्रतिक्षित सिनेमा Animal चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'कबीर सिंग' फेम दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डीच्या या आगामी सिनेमातरणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. सिनेमाचा धाँसू ट्रेलर पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. प्रचंड हिंसा आणि Action सीन्सने भरलेला हा ट्रेलर शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा आहे.

साडेतीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये रणबीर आणि अनिल कपूरच्या बाप-बेटा नात्याची बाजू दाखवण्यात आली आहे. आपला बाप आपल्यावर खूश व्हावा म्हणून मुलगा कोणत्याही थराला जाताना दिसतो. लेकाच्या मनात बापाविषयी जेवढा आदर आहे तेवढाच रागही असल्याचं स्पष्ट दिसून येतं. रणबीर-रश्मिकाची केमिस्ट्रीही चांगली वाटत आहे. मात्र सिनेमातील खरं सरप्राईज म्हणजे बॉबी देओल. त्याने खलनायक म्हणून जबरदस्त भाव खाल्ला आहे. ट्रेलरच्या शेवटी बॉबीची एन्ट्री होते तेव्हा भलेभले कापतील असाच तो स्क्रीवर दिसत आहे. एकूणच जबरदस्त ट्रेलरने अपेक्षा उंचावल्या आहेत.

१ डिसेंबरला Animal सिनेमा रिलीज होतोय. रणबीर कपूरचा लूक सुरुवातीपासूनच चर्चेत होता. आता सिनेमाच्या ट्रेलरमधून गोष्टीचा अंदाज आला आहे. ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी ताणली आहे.

Web Title: Animal Movie trailer released Ranbir Kapoor and anil kapoor father son relationship is real attraction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.