सनी देओलने केलं बॉबी देओलचं कौतुक, तारा सिंग पडला 'अ‍ॅनिमल'च्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 12:40 PM2023-12-01T12:40:18+5:302023-12-01T12:50:53+5:30

सनी देओलने 'अ‍ॅनिमल' चित्रपटासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.

animal sunny deol praised ranbir kapoor and bobby deol film actor like his little brother acting | सनी देओलने केलं बॉबी देओलचं कौतुक, तारा सिंग पडला 'अ‍ॅनिमल'च्या प्रेमात

सनी देओलने केलं बॉबी देओलचं कौतुक, तारा सिंग पडला 'अ‍ॅनिमल'च्या प्रेमात

बॉलिवूड स्टार्स रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना आणि बॉबी देओल 'अ‍ॅनिमल' थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटाचा पहिला शो पाहिल्यानंतर चाहते खूप खूश दिसले. नुकतेच 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचे स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. या स्क्रिनिंगला आलिया भटसह अनेक बडे स्टार्स उपस्थित होते. दरम्यान, सनी देओलनेबॉबी देओलचे या सिनेमातील भूमिका पाहून कौतुक केले आहे.

रणबीर कपूर आणि बॉबी देओलचा 'अ‍ॅनिमल' चित्रपटाने रिलीज होताच धमाका केला आहे. 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचे लोक खूप कौतुक करताना दिसत आहेत. दरम्यान, सनी देओलने 'अ‍ॅनिमल' चित्रपटासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. सनी देओलने पोस्ट शेअर करत बॉबी देओलचे कौतुक केले. सनी देओलने त्याचा भाऊ बॉबी देओलसोबतचे काही फोटोही शेअर केले आहेत. सनी देओलने फोटोसोबत एक सुंदर कॅप्शनही दिले आहे. माझ्या लहान भावाने चित्रपटात खळबळ माजवली आहे. सनी देओलने 'अ‍ॅनिमल'च्या स्टार कास्टला शुभेच्छा दिल्या आहेत. 

बॉबी देओल आणि अनिल कपूर यांच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचे सर्वजण कौतुक करताना दिसत आहेत. रिपोर्टनुसार चित्रपटाची 7 लाखांहून अधिक तिकिटांची आगाऊ विक्री झाली आहे. त्यानंतर असे मानले जात आहे की 'अ‍ॅनिमल' चित्रपटाने पहिल्या दिवशी 40 कोटींहून अधिक कमाई केली आहे. त्यामुळे वर्ल्डवाइड पहिल्या दिवशी 100 कोटी रुपये कमवू शकतो.
 

Web Title: animal sunny deol praised ranbir kapoor and bobby deol film actor like his little brother acting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.