Animal Teaser: सनी देओलनंतर ईशाने केलं सावत्र भाऊ बॉबी देओलच्या सिनेमाचं कौतुक, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 08:56 AM2023-09-29T08:56:35+5:302023-09-29T09:10:36+5:30

सावत्र बहिण ईशा देओलने शेअर केलेली अ‍ॅनिमल सिनेमाच्या टीझरची पोस्ट बॉबी देओने रिशेअर देखील केलीय.

Animal teaser esha deol cheers for brother bobby deol part in ranbir kapoor says wait for the last shot | Animal Teaser: सनी देओलनंतर ईशाने केलं सावत्र भाऊ बॉबी देओलच्या सिनेमाचं कौतुक, म्हणाली...

Animal Teaser: सनी देओलनंतर ईशाने केलं सावत्र भाऊ बॉबी देओलच्या सिनेमाचं कौतुक, म्हणाली...

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमध्ये देओल कुटुंब प्रसिद्धीझोतात आलं. आधी सनी देओलच्या (Sunny deol) मुलाचं लग्न पार पडलं. या लग्नात हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन्ही मुली दिसल्या नाहीत. मात्र  सनी देओलने 'गदर २'च्या यशानिमित्त चक्क सावत्र बहीण ईशा देओलने खास स्क्रीनिंग ठेवली होती. त्यावेळी अनेक वर्षांनी देओल सावत्र भाऊ बहिणींना एकत्र पाहिलं गेलं. आता ईशाने या भाऊ बॉबी देओलच्या अ‍ॅनिमल सिनेमाचा टीझर पाहून कौतुक केलं  आहे.  

रणबीर कपूरच्या अ‍ॅनिमल या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. रणबीरच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी 'एनिमल' या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. रणबीरसोबतच रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, तृप्ती डिमरी आणि बॉबी देओल हे अ‍ॅनिमलमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. टीझरच्या शेवटी बॉबी देओलची एक छोटीशी झलक दिसत आहे. सिनेमातील त्याचा लूक पाहिल्यानंतर बहीण ईशा देओलने त्याचे कौतुक केले आहे. 

ईशाने इन्स्टाग्राम स्टोरीवर अ‍ॅनिमलचा टीझर शेअर केला आहे. शेअर करताना त्याने लिहिले - शेवटच्या शॉटची प्रतीक्षा करा.  बॉबी देओल. बॉबीने सावत्र बहिण ईशाची पोस्ट पुन्हा रिशेअर केली आहे. ईशा सोशल मीडियावर तिच्या भावांना सपोर्ट करत असते. ती त्यांच्या चित्रपटांबद्दलच्या पोस्ट शेअर करत असते.

सिनेमाबबात बोलायचे झाले तर अ‍ॅनिमलमध्ये बॉबी देओल नेगेटीव्ह भूमिका साकारतो आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' या सिनेमाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. डिसेंबर महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १ डिसेंबरला रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Animal teaser esha deol cheers for brother bobby deol part in ranbir kapoor says wait for the last shot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.