अंकिता लोखंडेचा नवीन व्हिडीओ चाहत्यांसाठी ठरतोय डोक्याला शॉट, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 11:21 AM2021-01-08T11:21:42+5:302021-01-08T11:22:47+5:30
अंकिता लोखंडे आणि सुशांतची भेट 2009 मध्ये पवित्र रिश्ता मालिकेवेळी झाली होती. त्यानंतर दोघेही 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. पुढे 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले होते.
छोटा पडदा ते रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी अंकिता लोखंडे सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. सतत आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते. तिच्या या व्हिडीओंमुळेच तिला अनेकदा ट्रोलही केले जाते. चाहते तिच्या व्हिडीओंवर कमेंट करत नाराजीही व्यक्त करतात. मात्र या गोष्टीचा फारसा अंकिताला फरक पडत नाही. त्यामुळे वेळ पडताच अंकिता ट्रोलर्सचीही बोलती बंद करते. पुन्हा एकदा तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती डान्स करताना पाहायला मिळतेय. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्यही खुलून गेले आहे.
सुशांतच्या मृत्यूला काही महिनेच झाले असताना अंकिताने इतक्या धूमधडाक्यात बर्थ डे साजरा केला, हेही अनेकांना खटकले. यावरूनही अंकिताला ट्रोल केले गेले. सुशांतसाठी तरी यावर्षी बर्थ डे साजरा करायचा नसता, असे म्हणत अनेकांनी तिच्यावर टीका केली होती.
अंकिता लोखंडे विकी जैनसह असलेल्या रिलेशनशिपमुळे सध्या चर्चेत आहे. लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. अंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते.
अंकिता आणि सुशांतची भेट 2009 मध्ये पवित्र रिश्ता मालिकेवेळी झाली होती. त्यानंतर दोघेही 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. पुढे 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले होते. या ब्रेकअप होण्यामागे वेगवेगळी कारणे सांगितली गेली. पण तो भूतकाळ झाला आणि विकी हा अंकिताचा वर्तमान आहे.
अंकिताने एका मुलाखतीत सांगितले होते की, सुशांत आधीसारखा राहिला नव्हता. आता तो आधी ज्या लोकांसोबत राहत होता त्यांच्या टचमध्ये राहत नव्हता. त्याच्या वागण्यात बदल झाला होता आणि तो आधीसारखा फोन कॉलही करत नव्हता. दोघांच्या करिअरचे ट्रॅक वेगळे झाले होते आणि दोघांमध्ये कामामुळे अंतर वाढलं होतं. याच कारणाने दोघांचं ब्रेकअप झालं.