अंकिताने बॉयफ्रेन्डसोबत साजरी केली दिवाळी; लोक म्हणाले, सुशांतला विसरली का? 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 10:17 AM2020-11-16T10:17:07+5:302020-11-16T10:20:27+5:30

टीव्ही ते बॉलिवूडपर्यंत आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या ट्रोल होतेय. कारण काय तर तिच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो.

ankita lokhande celebrated diwali with boyfriend vicky jain shares photo trolled |  अंकिताने बॉयफ्रेन्डसोबत साजरी केली दिवाळी; लोक म्हणाले, सुशांतला विसरली का? 

 अंकिताने बॉयफ्रेन्डसोबत साजरी केली दिवाळी; लोक म्हणाले, सुशांतला विसरली का? 

googlenewsNext
ठळक मुद्देअंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते.

टीव्ही ते बॉलिवूडपर्यंत आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या ट्रोल होतेय. कारण काय तर तिच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो. या फोटोत अंकिता कमालीची सुंदर दिसतेय. पिंक कलरच्या लहंग्यातील हे फोटो अंकिताने तिच्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत. खास म्हणजे या फोटोत अंकिताचा बॉयफ्रेन्ड विकी जैन हाही तिच्यासोबत आहे. दोघांनी मस्तपैकी एकत्र पोज दिल्या आहेत. मला, तुला सर्वांना हॅपी दिवाली, असे कॅप्शन हे फोटो शेअर करताना अंकिताने लिहिले आहे. मात्र नेमक्या याच फोटोंमुळे अंकिताला ट्रोल झाली. सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांनी तिला ट्रोल केले.

इतक्यात सुशांतला विसरली का? असा सवाल सुशांतच्या एका नाराज चाहत्याने केला. जस्टिस फॉर सुशांत सिंग राजपूतचे काय झाले?असा सवालही अनेकांनी तिला केला.

सर्वांसमोर मागितली  माफी

नुकतेच अंकिताने एक पोस्ट शेअर करत बॉयफ्रेंड विक्की जैनची खुल्लमखुल्ला सर्वांसमोर माफी मागितली होती. अंकिता लोखंडेने या पोस्टसोबत स्वत:चा आणि विक्की जैनचा फोटो शेअर केला होता. या पोस्टमध्ये अंकिता लोखंडेने लिहिले की, तुझ्यासाठी माझ्या असलेल्या भावना मी शब्दात व्यक्त करू शकणार नाही. जेव्हा मी आपल्या दोघांना एकत्र पाहते तेव्हा माझ्या डोक्यात सर्वात आधी एकच गोष्ट येते की माझ्या जीवनात एक मित्र, पार्टनर आणि सोलमेटसारखा व्यक्ती पाठवल्यामुळे मी देवाची आभारी आहे. माझ्या प्रत्येक अडचणीत साथ दिल्याबद्दल आभारी आहे. माझी प्रत्येक अडचण स्वत:ची समजून माझी मदत केल्यामुळे मी आभारी आहे. माझा सपोर्ट सिस्टम बनण्यासाठी मी आभारी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला आणि माझी परिस्थिती समजून घेतली त्यासाठी आभारी आहे. माझ्यामुळे तुला टीका सहन करावी लागली त्यासाठी मला माफ कर. शब्द कमी पडतील पण आपले बॉण्डिंग खूप छान आहे. आय लव्ह यू, असे तिने या पोस्टमध्ये लिहिले होते.

अंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. अंकिता आणि सुशांतची भेट 2009 मध्ये पवित्र रिश्ता मालिकेवेळी झाली होती. त्यानंतर दोघेही 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. पुढे 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअप होण्यामागे वेगवेगळी कारणे सांगितली गेली. पण तो भूतकाळ झाला आणि विकी हा अंकिताचा वर्तमान आहे. 

अंकिता लोखंडे व विकी जैनच्या प्रेमाला बहर; म्हणाली, हा आहे माझा बेबी...!

Web Title: ankita lokhande celebrated diwali with boyfriend vicky jain shares photo trolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.