मराठमोळ्या पद्धतीनं अंकिता लोखंडेनं साजरी केली पहिली मकरसंक्रांत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 16:28 IST2022-01-15T16:28:01+5:302022-01-15T16:28:40+5:30
अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आता मिसेस जैन झाली आहे. अंकिताने लग्नानंतरचा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत नुकताच साजरा केला.

मराठमोळ्या पद्धतीनं अंकिता लोखंडेनं साजरी केली पहिली मकरसंक्रांत
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे आता मिसेस जैन झाली आहे. १४ डिसेंबरला अंकिता विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकली. नुकताच अंकिताने लग्नानंतरचा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत मराठमोळ्या पद्धतीने साजरा केला. तिने लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत आपल्या कुटुंबासोबत आणि जवळच्या मैत्रिणीसोबत साजरी केली आहे. तिने सोशल मीडियावर मकर संक्रांतीच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केली आहे.
अंकिता लोखंडे हिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता आपल्या कुटुंबातील स्त्रियांसोबत हळदी-कुंकू करताना दिसते आहे. याशिवाय व्हिडीओत अंकिताने काळ्या रंगाची साडी नेसलेली आणि त्यावर हलव्याचे दागिने परिधाने केलेले ही पाहायला मिळात आहेत. महाराष्ट्रात नववधू तिच्या पहिल्या मकरसंक्रांतीला काळ्या रंगाची साडी नेसून त्यावर हलव्याचे दागिने परिधान करून आणि हळदी-कूंकू करण्याची प्रथा आहे. याप्रमाणेच अंकितानेही अगदी पारंपारिक पद्धीतने तिची पहिली मकरसंक्रांत साजरी केली. याशिवाय लग्नानंतरची अंकिताची पहिलीच मकरसंक्रांत असल्याने तिने तिचे घर पतंग लावून सजवलेले पाहायला मिळत आहे.
अंकिता लोखंडेने बॉयफ्रेंड विकी जैनसोबत १४ डिसेंबर महिन्यात लग्न केले. त्यांच्या लग्नाला आता एक महिना झाला आहे. अंकिता आणि विकीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच लग्न झाल्यापासून अंकिता विकीसोबतचे फोटो शेअर करत असते. बऱ्याचदा तिचे फोटो चर्चेत येत असतात.