अंकिता लोखंडेचे ‘गोलमाल अगेन’ ! म्हणे, मी असे म्हटलेच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 10:59 AM2019-02-26T10:59:19+5:302019-02-26T11:01:11+5:30

‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी टीव्ही अ‍ॅक्ट्रेस अंकिता लोखंडे कधीच तिच्या रिलेशनशिपबद्दल खुलेपणाने बोललेली नाही.

ankita lokhande exclusive revealed relationship with vicky jain | अंकिता लोखंडेचे ‘गोलमाल अगेन’ ! म्हणे, मी असे म्हटलेच नाही!

अंकिता लोखंडेचे ‘गोलमाल अगेन’ ! म्हणे, मी असे म्हटलेच नाही!

googlenewsNext
ठळक मुद्देमणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटात कंगना राणौत मुख्य भूमिकेत होती. तर अंकिताने झलकारी बाईची भूमिका साकारली होती.

‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी टीव्ही अ‍ॅक्ट्रेस अंकिता लोखंडे कधीच तिच्या रिलेशनशिपबद्दल खुलेपणाने बोललेली नाही. सुशांत सिंग राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिताचे नाव उद्योगपती विकी जैनसोबत जोडले जातेय. याबद्दल जेव्हा केव्हा अंकिताला छेडले गेले, तिने कायम ‘गोलमाल’ उत्तर दिले. कधी तिचे उत्तर ऐकून ती रिलेशनशिपमध्ये असल्याचे वाटले तरी कधी ती मुळीच रिलेशनशिपमध्ये नाही, असे जाणवले. ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ रिलीज होण्यापूर्वी अंकिता विकीसोबत लग्न करणार,अशी बातमी आली. पण नंतर ही बातमीही खोटी ठरली. आता अंकिताने पुन्हा एकदा विकीसोबतच्या रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा केला आहे.

‘मी हे कधीच म्हटले नाही. मला नाही ठाऊक हे कुणी म्हटले,’ असे अंकिता म्हणाली. आता अंकिता हे कुण्या संदर्भाने म्हणाली, कशाबद्दल म्हणाली, हे ठाऊक नाही. काही दिवसांपूर्ची ‘मी रिलेशनशिपमध्ये आहे, पण लग्नाचा कुठलाही इरादा नाही,’असे ती म्हणाली होती. कदाचित याचबद्दल अंकिता बोलत असावी. आता यावरून काढायचा तो अर्थ तुम्ही काढा.

‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटात कंगना राणौत मुख्य भूमिकेत होती. तर अंकिताने झलकारी बाईची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले. बॉक्सआॅफिसवरही या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा गाठला.सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांचा ‘पवित्र रिश्ता’ तुटला तेव्हा, अनेकांना धक्का बसला होता. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या सेटवर सुशांत व अंकिता एकत्र आले होते. हळूहळू दोघांचे प्रेम बहरले आणि मग हे लव्हबर्ड्स जगाची पर्वा न करता एकत्र हिंडू-फिरू लागले. इतके की दोघांचे एकमेकांशिवाय पानही हलेना. सुशांत व अंकिता अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण अचानक काही तरी बिनसले आणि हे नाते ब्रेकअपपर्यंत पोहोचले. या ब्रेकअपनंतर अंकिता डिप्रेशनमध्ये गेल्याच्याही बातम्या आल्या. तिला सावरायला बराच वेळ लागला. पण ती सगळ्यांतून सावरली.

Web Title: ankita lokhande exclusive revealed relationship with vicky jain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.