सुशांतच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच घराबाहेर पडली अंकिता लोखंडे, केले हे काम, पहा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 14:48 IST2020-07-28T14:47:10+5:302020-07-28T14:48:05+5:30
सुशांतच्या निधनाच्या वृत्ताच्या धक्क्यातून अद्याप त्याचे चाहते व जवळचे फ्रेंड्स सावरलेले नाहीत. त्यात त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे कोलमडून गेली आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच घराबाहेर पडली अंकिता लोखंडे, केले हे काम, पहा व्हिडिओ
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला एक महिना उलटून गेला. अद्याप त्याच्या आत्महत्येमागचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. त्यात सोशल मीडियावर काही सेलिब्रेटी व चाहते त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी ही मागणी करत आहेत. त्याच्या निधनाच्या धक्क्यातून अद्याप त्याचे चाहते व काही सहकलाकार सावरलेले नाहीत. त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे कोलमडून गेली आहे. या सदम्यातून बाहेर पडण्यासाठी ती प्रयत्न करत आहे. यादरम्यान सुशांतच्या निधनानंतर पहिल्यांदाच अंकिता घराबाहेर पडताना दिसली. तिचे त्यावेळीचे व्हिडिओ व फोटो व्हायरल होत आहेत.
अंकिता लोखंडेचा व्हिडिओ विरल भयानीने इंस्टाग्रामवर शेअर केला असून हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत ती एका मैत्रिणीसोबत एका ग्रोसरी दुकानात सामान विकत घेताना दिसते आहे. तसेच त्यावेळी दुकानाबाहेर असलेल्या गरजू लोकांना चॉकलेट देताना दिसते आहे. तिचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होतो आहे आणि तिचे हे काम पाहून तिचे चाहते तिचे कौतूक करत आहेत.
सुशांत सिंग राजपूतने वांद्रे येथील राहत्या घरी 14 जून रोजी गळफास लावून आत्महत्या केली होती.
तो नैराश्यात असल्यामुळे त्याने इतक्या टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.