बास झालं, आता शांत बसा...! अंकिता लोखंडेनं ट्रोलर्सला सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 02:58 PM2020-12-21T14:58:29+5:302020-12-21T15:10:39+5:30
अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या बर्थ डे पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पण यापैकी एक व्हिडीओ पाहून सुशांत सिंग राजपूतच्या फॅन्सचा पारा चढला होता.
अभिनेत्री अंकिता लोखंडेने शनिवारी (19 डिसेंबर) वाढदिवस साजरा केला. या पार्टीला अंकिताचे मित्र-मैत्रिणी आणि काही सेलेब्स सुद्धा पोहोचले. या पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण यापैकी एक व्हिडीओ पाहून सुशांत सिंग राजपूतच्या फॅन्सचा पारा चढला होता. होय, या व्हिडिओमध्ये सुशांतचा मित्र संदीप सिंह स्पॉट झाला होता. या संदीपवर अनेक आरोप झाले होते. यामुळे अंकिताच्या बर्थ डे पार्टीत तो दिसताच ती प्रचंड ट्रोल झाली. आता या ट्रोलिंगला अंकिताने परखड शब्दांत उत्तर दिले आहे.
अंकिताने तिच्या वाढदिवसाचे आणखी काही फोटो शेअर करत, ट्रोलर्सला सुनावले.
‘शुभेच्छा मिळाल्या. त्यासाठी सर्वांचे आभार. तुम्ही जो काही तर्क काढता, त्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य आहे. तुम्ही जसा विचार करता,तसेच तुमचे आयुष्य असले पाहिजे. रिलॅक्स करा. तुम्ही खूप काही केले. आता एक दीर्घ श्वास घ्या आणि गोष्टी काळासोबत पुढे जाऊ द्या. प्रत्येक क्षण मनापासून जगण्याचा प्रयत्न करा,’ असे अंकिताने म्हटले आहे.
तुम्हाला आठवत असेलच की, सुशांत सिंग राजपूत प्रकरणात संदीप सिंगचे नाव आले होते. संदीप हा सुशांतचा मित्र होता, तसेच अंकिताचाही तो मित्र आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर मात्र सोशल मीडियावर याच संदीपवर अनेक आरोप झाले होते. संदीपने पुराव्यांसोबत छेडछाड केल्याचा आरोपही सुशांतच्या चाहत्यांनी केला होता. अर्थात संदीपने हे आरोप नाकारले होते. हाच संदीप अंकिताच्या बर्थ डे पार्टीत दिसताच सुशांतच्या चाहत्यांचा संताप अनावर झाला होता. मग काय, यावरून अंकिता ट्रोल झाली होती.
सुशांतच्या मृत्यूला काही महिनेच झाले असताना अंकिताने इतक्या धूमधडाक्यात बर्थ डे साजरा केला, हेही अनेकांना खटकले होते. यावरूनही अंकिताला ट्रोल केले गेले. सुशांतसाठी तरी यावर्षी बर्थ डे साजरा करायचा नसता, असे म्हणत अनेकांनी तिच्यावर टीका केली. शेखर सुमनने यावर्षी स्वत:चा वाढदिवस साजरा केला नाही, याची आठवणही अनेकांनी तिला करून दिली. संदीप सिंगला तू पार्टीत बोलवले आणि व्हिडीओत लपवले. तुझ्याबद्दल आधी आदर होता. पण आता थोडाही आदर नाही, असे एका युजरने लिहिले. अर्थात काहींनी अंकिताची बाजू घेत, तिला सपोर्टही केला. सुशांत हा अंकिताचा भूतकाळ होता. तिलाही आनंदी राहण्याचा अधिकार आहे, असे म्हणत अनेकांनी तिची बाजू मांडली.