बिग बॉसमध्ये घटस्फोटाच्या चर्चा, आता अंकिता लोखंडेने पती विकी जैनसोबत केलं पुन्हा लग्न? फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 01:01 PM2024-03-20T13:01:01+5:302024-03-20T13:02:06+5:30
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे (ankita lokhande) सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. अलिकडेच ती आणि तिचा पती बिग बॉसमध्ये झळकले होते. तेव्हापासून ही जोडी सातत्याने चर्चेत येत आहे. बिग बॉसच्या घरात अंकिता आणि विकी (vicky jain) यांचे सातत्याने वाद सुरु होते. त्यामुळे हा शो संपल्यानंतर ही जोडी वेगळं होणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण, बिग बॉसमधून बाहेर पडताच त्यांनी एकमेंकापासून कधीच वेगळ होणार नसल्याचं सांगितलं. आता यातच या जोडप्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघेही सात फेरे घेताना दिसत आहेत. या फोटोने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली. या दोघांनी चौथ्यांदा लग्न केल्याचा अंदाज सर्वजण लावत आहेत.
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हे कपल साऊथ इंडियन लूकमध्ये दिसत आहे. अंकिता दक्षिण भारतीय शैलीत साडी परिधान केलेली दिसत आहे, तर विकी शर्ट-पॅन्टमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये दोघेही एकमेकांचे हात पकडून फेरे घेत असल्याचं दिसून येत आहे. अंकिता आणि विकीचं पुन्हा एकदा लग्न झाल्याचं हा फोटो सांगत आहे. मात्र, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. काही चाहत्यांच्या हा फोटो त्यांच्या आगामी प्रोजक्टमधील असू शकतो. स्क्रिनवर दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
अंकिता लोखंडेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती रणदीप हुडासोबत 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटात दिसणार आहे. 'वीर सावरकर' सिनेमात अंकिता लोखंडेने यमुनाबाई सावरकर ही भूमिका साकारली आहे. यमुनाबाई या सावरकरांच्या पत्नी आहेत. पतीप्रमाणेच त्याही अतिशय कणखर आहेत. हा चित्रपट रणदीपने दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट 22 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये सिनेमा असणार आहे.