त्याच्यासाठी RIP कसे लिहू? मी आजही सुशांतसोबत बोलते...! अंकिता लोखंडेने ट्रोलर्सला दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 12:00 PM2021-03-25T12:00:38+5:302021-03-25T12:01:47+5:30

‘मी कधीच त्याच्यासाठी RIP लिहू शकत नाही. पण लोकांनी मला यावरून जज करणे सुरु केले. मला टोमणे मारले....’

ankita lokhande reveals she sometimes can talk to sushant singh rajput | त्याच्यासाठी RIP कसे लिहू? मी आजही सुशांतसोबत बोलते...! अंकिता लोखंडेने ट्रोलर्सला दिले उत्तर

त्याच्यासाठी RIP कसे लिहू? मी आजही सुशांतसोबत बोलते...! अंकिता लोखंडेने ट्रोलर्सला दिले उत्तर

googlenewsNext
ठळक मुद्देयाच मुलाखतीत अंकिताने सुशांतसोबत झालेल्या ब्रेकअपमागचे कारणही सांगितले होते.

सुशांत सिंग राजपूत या जगात नाहीये. पण अद्यापही सुशांत नाही, हे मानायला मन तयार नाही. सुशांतच्या मृत्यू हा त्याच्या तमाम चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. त्याच्या कुटुंबाबद्दल आणि सुशांतची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकितासाठी तर अद्यापही या धक्क्यातून सावरलेले नाहीत. सुशांत गेला पण मी अजूनही त्याच्यासोबत बोलू शकते, असे अंकिताने म्हटले आहे.
बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत अंकिता यावर मनमोकळेपणाने बोलली. ‘सुशांतच्या मृत्यूची बातमी आली, ती ऐकून मला विश्वासच बसेना. अनेक दिवस मी धक्क्यात होती. मी आज नॉर्मल वाटतेय, पण मी आणि सुशांतच्या कुटुंबाने खूप काही सहन केले आहे. संपूर्ण जग त्याच्यासाठी रडत हाते. काही दिवसांपूर्वी एक महिला माझ्याजवळ आली आणि सुशांतच्या आठवणीत रडू लागली. अनेकदा मला वाटते, सुशांत अवतीभवती आहे. मी त्याच्याशी बोलू श्कते. बघ, लोक तुझ्यावर किती प्रेम करत होते, असे मी त्याला सतत सांगत असते. सुशांत गेला, आता तो कधीच परतणार नाहीये. मी कित्येक दिवस नुसती रडत होते. दुसरीकडे लोकांनी मला ट्रोल करणे सुरु केले होते. मी सुशांतसाठी ‘RIP’ पोस्ट का टाकली नाही? असा सवाल मला करत होते,’ असे ती म्हणाली.

मी कधीच त्याच्यासाठी रेस्ट इन पीस लिहू शकत नाही...
मी कधीच त्याच्यासाठी RIP लिहू शकत नाही. पण लोकांनी मला यावरून जज करणे सुरु केले. मला टोमणे मारले. तो गेला त्यादिवशी मी त्याचा फोटो शेअर करून पोस्ट टाकली नाही, म्हणून मला नको ते बोलू लागले. मला कळेना, तुमची जवळची व्यक्ती अशी गेली तर तुम्ही त्याचे फोटो शेअर करता का? मी कधीच सुशांतच्या फोटोसोबत RIP लिहिले नाही. माझ्यात ती हिंमत नव्हती व नाही. रेस्ट इन पीस सुशांत असे मी कधीच म्हणू शकत नाही, असे अंकिता म्हणाली. 

याच मुलाखतीत अंकिताने सुशांतसोबत झालेल्या ब्रेकअपमागचे कारणही सांगितले होते. सुशांतने मी आणि करिअरपैकी करिअर निवडले आणि तो निघून गेला. मी त्याच्या परतण्याची खूप वाट बघितली. अडीच वर्षे खूप काही भोगले. मी नाही तर तो मला सोडून गेला होता, असे ती म्हणाली होती.

मी नाही, त्यानं मला सोडलं...! सुशांतच्या मृत्यूनंतर 9 महिन्यांनी अंकिता लोखंडे ब्रेकअपवर बोलली

Web Title: ankita lokhande reveals she sometimes can talk to sushant singh rajput

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.