म्हणून मी सुशांतच्या अंत्यविधीला गेले नव्हते...! अंकिता लोखंडेने पहिल्यांदाच सांगितले कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 12:57 IST2020-08-02T12:56:24+5:302020-08-02T12:57:23+5:30
सुशांतच्या अंत्यविधीला अंकिता हजर नव्हती. यावरून ती ट्रोलही झाली होती....

म्हणून मी सुशांतच्या अंत्यविधीला गेले नव्हते...! अंकिता लोखंडेने पहिल्यांदाच सांगितले कारण
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्याची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे हिने पहिल्यांदा मौन सोडत अनेक खुलासे केले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अंकिता सुशांतबद्दल कदाचित पहिल्यांदाच इतकी बोलली. सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता कोलमडली होती. मात्र सुशांतच्या अंत्यविधीला अंकिता हजर नव्हती. यावरून ती ट्रोलही झाली होती. आता अंकिताने सुशांतच्या अंत्यविधीला उपस्थित न राहण्यामागचे कारण सांगितले आहे.
‘मी सुशांतला कधीच त्या अवस्थेत पाहू शकले नसते. मी त्याला त्या अवस्थेत पाहिले असते तर मी कधीच विसरू शकले नसते. त्यामुळे मी त्याच्या अंत्यविधीला न जाण्याचे ठरवले,’ असे अंकिताने सांगितले.
ती म्हणाली, ‘त्यादिवशी मी झोपले होते. अचानक मला एका पत्रकाराचा फोन आला. त्या पत्रकारानेच मला पहिल्यांदा सुशांतच्या आत्महत्येची बातमी दिली. ती बातमी ऐकताच मला धक्का बसला. माझ्या पायाखालची जमीन सरकली. सुशांत असे काही करेल, याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. काय बोलू, काय करू, काहीच सुचत नव्हते. मी नुसती रडत होते. त्याच्या अंत्यविधीला मी जाऊच शकणार नव्हते. सुशांतला त्या अवस्थेत बघणे माझ्यासाठी शक्य नव्हते. म्हणून मी अंत्यविधीला जाणे टाळले. पण त्याच्या कुटुंबाला भेटायला मात्र मी गेले. त्यांना भेटणे, त्यांचे सांत्वन करणे माझे कर्तव्य होते.’
सुशांत डिप्रेशनमध्ये असूच शकत नाही...
सुशांत डिप्रेशनमध्ये जाणे शक्यच नाही. तो डिप्रेशनमध्ये होता, असे म्हणणारे त्याला किती ओळखतात? मी त्याला ओळखत होते. तो नैराश्यात जाणारा मुलगा नव्हताच. मी हे दाव्यानिशी सांगू शकते, असेही अंकिताने या मुलाखतीत सांगितले होते.
तर कधीच आत्महत्या केली असती...
सुशांतने आत्महत्या करूच शकत नाही. असे असते तर त्याने कधीच केली असती. पवित्र रिश्ता ही मालिका सोडल्यानंतर तो तीन वर्षे घरी बसून होता. त्याच्याजवळ काहीच काम नव्हते. बॉलिवूडमध्ये तो स्ट्रगल करत होता. मी कामावर जायचे आणि तो एकटा घरी असायचा. नैराश्य आणि काम मिळत नसल्यामुळे आत्महत्या करायची असती तर त्याने तेव्हाच केली असती, असेही अंकिता या मुलाखतीत म्हणाली.