सुशांत सिंग राजपूतसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे 'बाजीराव मस्तानी' सिनेमा नाकारला, अंकिता लोखंडेने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 10:14 PM2021-03-23T22:14:42+5:302021-03-23T22:15:12+5:30

अंकिता लोखंडेने एका मुलाखतीत तिच्या करिअरच्या संदर्भातील मोठा खुलासा केला आहे.

Ankita Lokhande says she refused 'Bajirao Mastani,' 'Happy New Year' for Sushant | सुशांत सिंग राजपूतसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे 'बाजीराव मस्तानी' सिनेमा नाकारला, अंकिता लोखंडेने केला खुलासा

सुशांत सिंग राजपूतसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे 'बाजीराव मस्तानी' सिनेमा नाकारला, अंकिता लोखंडेने केला खुलासा

googlenewsNext

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला जवळपास ९ महिने उलटून गेले आहेत. त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिने २०१६ साली झालेल्या त्यांच्या ब्रेकअपबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. एका मुलाखतीत अंकिता लोखंडेने सांगितले की, या ब्रेकअपमुळे तिने संजय लीला भन्साळीचा 'बाजीराव मस्तानी' आणि अशा पाच मोठ्या चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या.


डीएनएला दिलेल्या मुलाखतीत अंकिताने तिच्या आणि सुशांतच्या ब्रेकअप दरम्यानची सर्व परिस्थिती सांगितली. ती आज भलेही आपल्या आयुष्यात पुढे निघून गेली असली तरी दिवंगत अभिनेता सुशांतसोबतच्या ब्रेकअपनंतर ती पूर्णपणे कोलमडून गेली होती. अशा परिस्थितीत तिने तिच्या करिअरचीदेखील पर्वा केली नाही. त्यावेळी तिने स्ट्रेसमध्ये बॉलिवूडमधील मोठे पाच चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या होत्या. 


या मुलाखतीत अंकिताने सांगितले की, त्यावेळी मला फक्त लग्न करायचे होते. पण त्याला जीवनात पुढे जायचे होते. मी ब्रेकअप सहन करण्याच्या परिस्थितीत नव्हते. मला त्यावेळी स्वतःला सावरणे खूप कठीण जात होते. या तणावाखाली मी माझ्या करिअरची वाट लावली. अंकिताच्या नुसार तिने सुशांतच्या ब्रेकअपनंतरच्या तणावामुळे निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या दोन चित्रपटाचे प्रस्ताव नाकारले होते. त्यातील एक म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्राचा बाजीराव मस्तानी आणि दुसरा चित्रपट गोलियों की रासलीला रामलीला.


अंकिता लोखंडेच्या सांगण्यानुसार, तिने फराह खानचीदेखील ऑफर नाकारली. तिला शाहरूख खान अभिनीत हॅप्पी न्यू ईअरची ऑफर मिळाली होती. मात्र या चित्रपटात काम करण्यास अंकिताने नकार दिला होता. त्यावेळी ती मानसिक तणावाखाली होती. ती सुशांतला विसरू शकत नव्हती.


त्यानंतर अंकिता लोखंडेने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने कंगना राणौतचा चित्रपट मणिकर्णिकामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यात तिने झलकारी बाईची भूमिका केली होती. त्यानंतर ती बागी ३ चित्रपटात झळकली होती.

Web Title: Ankita Lokhande says she refused 'Bajirao Mastani,' 'Happy New Year' for Sushant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.