कन्फर्म - सुशांत सिंग राजपूतची एक्स अंकिता लोखंडे अडकणार लग्न बंधनात, बॉयफ्रेंडला किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 18:16 IST2019-04-25T18:15:18+5:302019-04-25T18:16:00+5:30
बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप होणं हे काही नवीन नाही. सुशांत सिंग राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेच्या आयुष्यात नव्या पार्टनरची एंट्री झाली आहे.

कन्फर्म - सुशांत सिंग राजपूतची एक्स अंकिता लोखंडे अडकणार लग्न बंधनात, बॉयफ्रेंडला किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप होणं हे काही नवीन नाही. सुशांत सिंग राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेच्या आयुष्यात नव्या पार्टनरची एंट्री झाली आहे. अंकिता बिझनेसमन विक्की जैनसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा आहे. दोघांचा किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. दोघांची ओळख एक कॉमन मित्राच्या माध्यमातून झाली. दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार लवकरच दोघे आपलं नातं पुढे घेऊन जाणार आहेत. रिपोर्टनुसार या वर्षाच्या अखेरिस अंकिता आणि विक्की लग्न करु शकतात. दोघे एकमेकांना गेल्या दोन वर्षांपासून ओळखत आहेत. सध्या अंकिता विक्कीच्या फॅमिलीसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करते आहे.
अंकिताला अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करायचे आहे. अंकिताचे लग्न महाराष्ट्रीयन पद्धतीने मुंबईत होणार असल्याची चर्चा आहे. सध्या लग्नाचे प्लॉनिग प्राथमिक स्टेजवर आहे.
विक्कीच्या आधी अंकिता सुशांत सिंग राजपूतला डेट करत होती. 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या सेटवर सुशांत व अंकिता एकत्र आले होते. हळूहळू दोघांचे प्रेम बहरले आणि मग हे लव्हबर्ड्स जगाची पर्वा न करता एकत्र हिंडू-फिरू लागले. सुशांत व अंकिता अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण अचानक काही तरी बिनसले आणि हे नाते ब्रेकअपपर्यंत पोहोचले.
वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर अंकिताने कंगना राणौतच्या मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. यात तिने झलकारी बाईची भूमिका साकारली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले.