अंकिता लोखंडने पोस्ट केले व्हॅकेशचे फोटो, विक्की जैनला टॅग करत विचारला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 12:03 IST2020-12-12T11:55:12+5:302020-12-12T12:03:28+5:30
अंकिता लोखंडे विकी जैनसह असलेल्या रिलेशनशिपमुळे सध्या चर्चेत आहे.

अंकिता लोखंडने पोस्ट केले व्हॅकेशचे फोटो, विक्की जैनला टॅग करत विचारला प्रश्न
अंकिता लोखंडे विकी जैनसह असलेल्या रिलेशनशिपमुळे सध्या चर्चेत आहे. लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. अंकिता लोखंडे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चाहत्यांसह फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. पर्सनल लाईफशी संबंधीत सगळ्या अपडेट ती देत असते. अंकिताने आता इन्स्टाग्रामवर बरेच फोटो पोस्ट केले आहेत. यात ती तिचा बॉयफ्रेंड विक्की जैनसोबत दिसते आहे.दोघेही स्नोफॉलची मजा लुटत आहेत.
अंकिता लोखंडेने अनेक फोटो पोस्ट केले आहेत. मात्र, फोटोचे कॅप्शन पाहता असे दिसते की हे फोटो जुने आहेत. अंकिताने लिहिले आहे की, आपण परत जाऊया? स्नोफॉल, विंटरबाबी सारख्या हॅशटॅग तिने या फोटोंसोबत दिले आहेत. विकी जैन आणि अंकिता एका सुंदर हिल स्टेशनवर मजा घेताना दिसत आहेत.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता काही काळ सिंगल होती. याचदरम्यान विकी जैन याने तिच्या आयुष्यात एन्ट्री घेतली. विकी जैनचा बॉलिवूडशी संबध नाही. तो एक उद्योगपती आहे. तो बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा को-ओनर आहे.
अंकिता लोखंडे आणि विक्की जैनने त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही पण ते सोशल मीडियावर आपल्यातलं बॉन्डिंग लपवत नाहीत. अंकिता लोखंडे बर्याचदा विकी जैन आणि तिच्या कुटूंबियांसह छायाचित्रे आणि व्हिडिओ पोस्ट करते.