अंकिता, आता हे काय नवे?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2016 11:33 PM2016-03-27T23:33:47+5:302016-04-06T21:24:28+5:30

सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे हे कपल सध्या चांगलेच चर्चेत आहे. आधी या कपलच्या ब्रेकअपची बातमी आली. सहा ...

Ankita, what's new now? | अंकिता, आता हे काय नवे?

अंकिता, आता हे काय नवे?

googlenewsNext
शांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे हे कपल सध्या चांगलेच चर्चेत आहे. आधी या कपलच्या ब्रेकअपची बातमी आली. सहा वर्षांचे सुशांत व अंकिताचे रिलेशन तुटल्याची बातमी वाचून अनेकांना आश्चर्य वाटले. मग या ब्रेकअप मागचे कारण काय, या चर्चेला उधाण आले. कुणी म्हणे, सुशांतची प्रगती आणि अंकिताची घसरण यामुळे संबंधात तणाव वाढला. कुणी आणखीच वेगळा निष्कर्ष काढला, सुशांतची परिणीतीसोबतच्या जवळीकीमुळे अंकिता नाराज असल्याचे त्यांनी सांगितले. सुशांतच्या वाढदिवसाच्या पार्टीत अंकिता दिसली नाही, म्हटल्यावर या चर्चांना अधिकच ऊत आला. सुशांत अंकिताच्या अति पझेसिव्ह स्वभावामुळे कंटाळला असल्याची बातमी आली.याचमुळे सुशांत व अंकिता वेगळे झाल्याचे समोर आले. खुद्द सुशांतने यानंतर, ‘इट इज नॉट गुड फिलिंग’असे सांगून त्याचे व अंकिताचे नाते जवळपास संपुष्टात आल्याचे  संकेत दिले. पण अंकिता बयाने यानंतर एका वृत्तपत्राला दीर्घ मुलाखत दिली आणि ती व सुशांत अद्यापही रिलेशनशिपमध्ये असल्याचा छातीठोक दावा केला. ब्रेकअपच्या बातम्या निव्वळ अफवा असल्याची ती म्हणाली. यानंतर सुशांत-अंकिताच्या बे्रकअपच्या बातम्या काहीशा शांत झाल्या. पण आता अंकिताने पुन्हा एक गूढार्थाने भरलेले टिष्ट्वट केल्याने पुन्हा एकदा संभ्रम वाढला आहे. ‘हमारी चाहतों का मिट ना सकेगा फसाना...’ही एका गीताची ओळ तिने टिष्ट्वट केली आहे. अंकिताला खरचं काही सांगायचेयं की ‘एम एस धोनी’ या सुशांतच्या आगामी चित्रपटासाठी हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट आहे, हे अंकिताच जाणे...
 

Hamari chahato ka mitt naa sakega fassana❤️

 

.......................................................................

अंकिता म्हणते, I love my man
सुशांतसिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे या ‘लव्हबर्ड’च्या ब्रेक-अपची बातमी गत आठवड्यात उठली अन् या दोघांच्याही चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. पण आता एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे अंकिताने ब्रेक-अपची बातमी नाकारली आहे. ब्रेक-अपच्या बातमीनंतर प्रथमच अंकिताने आपले मौन सोडत या विषयावर खुलासा केला आहे. सुशांत आणि माझ्यात ब्रेकअप ही निव्वळ अफवा आणि मूर्खपणाचा कळस आहे. सुशांत व मी रिलेशनशिपमध्ये होतो, आहोत आणि लग्नही करणार आहोत, असे अंकिताने म्हटले. मी सुशांतबद्दल थोडी पझेसिव्ह आहे. पण म्हणून सुशांत आणि त्याच्या को-स्टारबद्दल मला काहीही समस्या नाही, असे अंकिताने स्पष्ट केले आहे.

अंकिता म्हणते, सुशांत व माझ्या ब्रेकअपच्या बातम्या का व कुणी पेरल्या, मला ठाऊक नाही. या बातम्या म्हणजे निव्वळ बकवास आहे. मी कायम सुशांतसोबत होते व असेल. मी सुशांतवर बिनशर्त प्रेम केले आहे. ब्रेकअपच्या बातम्या निश्चितपणे क्लेषदायक आहेत.

परिणीती चोपडा सोबत सुशांतशी वाढलेल्या जवळीकीमुळे अंकिता नाराज असल्याच्या बातम्याही अंकिताने नाकारल्या. ती म्हणाली, यात काहीही तथ्य नाही. मी आंधळेपणाने सुशांतवर प्रेम करते. वाद प्रत्येकच कपलमध्ये होतात. तसे ते आमच्यातही होतात. पण या वादामुळे आम्ही दोघेही दूर जाऊ शकत नाही. मी माझ्या काही प्रोजेक्टमध्ये सध्या बिझी आहे. सुशांत त्याच्या प्रोजेक्टमध्ये. त्यामुळे आम्ही कदाचित आधी इतके भेटत नाही. मी कधीही त्याच्या सेटवर त्याला भेटायला गेलेली नाही. 

लग्नाबाबत विचारले असता ती म्हणाले,निश्चितपणे माझ्या लग्नाला मी सर्वांना बोलवेल. माझा सुशांतवर पूर्ण विश्वास आहे. तो वन-वूमन मॅन आहे आणि माझे माझ्या ‘मॅन’वर नितांत प्रेम आहे. आमच्या दोघांमध्येही जे काही होते, ते आमचे खासगी आयुष्य आहे, त्यात कुणीही पडावे,असे आम्हा दोघांनाही वाटत नाही. सुशांत एक प्रामाणिक व्यक्ति आहे. त्यामुळे मी त्याचा आदर करते. अशास्थितीत ब्रेकअपसारख्या बातम्या दु:खी करतात. सुशांत माझ्याशी कधीही गेम खेळू शकणार नाही,म्हणून मी त्याच्यावर प्रेम करते.
......................................

​इट इज नॉट अ गुड फिलिंग
एकीकडे सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्या वाटा वेगळ्या झाल्याची चर्चा आहे. दुसरीकडे दोघांमधील ट्विटर अकाऊंटमधील संवाद वेगळीच कहाणी सांगत अलीकडे. अलीकडे सुशांतने आपला एक फोटो टिष्ट्वटरवर पोस्ट केला. त्याखाली सुशांतने लिहिलेला मॅसेज त्याच्यावर प्रेम करणाºया कुणाच्याही मनाला स्पर्शून जाईल, असा होता. मी गर्दीत एकटा आहे. तू कुठे आहेत? असे सुशांतने लिहिले होते. यावर अंकितानेही लगेच रिप्लाय करीत, एकटे वाटून घेऊन नको. मी नेहमी तुझ्यासोबत आणि तुझ्या आयुष्यात आहे, असे लिहिले होते. यामुळे दोघांमध्ये नेमके काय, हे जाणून घ्यायला मार्ग नाही. सुशांत सध्या त्याच्या करिअरमध्ये व्यस्त आहे. याऊलट अंकिताकडे काम नाही. यामुळे दोघांमध्ये खटके उडत असल्याचे समजते. नेमके काय, हे जाणून घेण्यासाठी काही पत्रकारांनी सुशांतला गाठले. यावेळी सुशांतला थेट त्याच्या अंकितासोबतच्या ब्रेकअपबाबत विचारण्यात आले. यावर सुशांत फारसा बोलला नाही. मी आत्ता काहीही बोलणार नाही. इट इज नॉट अ गुड फिलिंग, प्लीज समजून घ्या, असे उत्तर सुशांतने दिले.सुशांतच्या या उत्तरावरून अंकितासोबत त्याचे सारे काही नीट नाही, याचेच संकेत मिळतात. नेमका आम्ही काय अर्थ घ्यायचा ते सांग रे बाबा!!!

Web Title: Ankita, what's new now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.