संगीत नाटक अकाडमी युवा पुरस्कार 2018 जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 04:40 PM2019-07-16T16:40:01+5:302019-07-16T16:40:49+5:30
संगीत नाटक अकादमीच्या वतीने २००६ सालापासून दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर ‘उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार’ दिले जातात. प
केंद्र सरकारचे कला क्षेत्रातील सर्वोच्च मानले जाणारे 2018 चे संगीत नाटक अकॅडमी युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. नृत्य, नाटक आणि संगीत या कलांची पहिली राष्ट्रीय अकादमी असलेल्या दिल्ली स्थित संगीत-नाटक अकादमीचे ‘उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार-२०१8’ जाहीर झाले आहेत. झाकीर हुसैन, सोनल मानसिंह, जतीन गोस्वामी, के कल्याणसुंदरम पिल्लई यांना फेलोशिप देण्यात आली असून 26 जून रोजी गुवाहाटीमध्ये झालेल्या मिटींगमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
संगीत श्रेत्रातील योगदानासाठी सुरेश वाडकर नाटक लेखक राजीव नाईक, अभिनयासाठी ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. तर शास्त्रीय गायक मधुप मुदगल, रंगकर्मी संजय उपाध्याय, अभिनेता टीकम जोशी, लोकगायिका मालिनी अवस्थी यांच्या सह देशातील एकूण ४4 कलाकारांचा यांत समावेश आहे. प्रसिद्ध नाट्यसमिक्षक दीवान सिंह बजेली यांना अकदमी पुरस्कार दिला जाणार.
तसेच संगीत नाटक अकादमीच्या वतीने २००६ सालापासून दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर ‘उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार’ दिले जातात. पस्तीस वर्षांच्या आतील युवा कलाकारांमधील प्रतिभेचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने या पुरस्कारांचे आयोजन करण्यात येते. विजेत्यांना पंचवीस हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.