किसी को जला के मज़लूमों की बद्दुआ क्यों लेना ? ‘संतप्त’ अन्नू कपूर यांची ‘झणझणीत’ पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 03:49 PM2021-04-23T15:49:27+5:302021-04-23T15:50:32+5:30
देशातील तमात सेलिब्रिटींच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी अन्नू कपूर यांची पोस्ट
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor ) सध्या जाम भडकले आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित त्यांनी देशातील तमात सेलिब्रिटींच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले आहे. कोरोनामुळे देशात हाहाकार माजला आहे. लोकांना ऑक्सिजनसाठी, औषधांसाठी, रूग्णालयातील बेड्ससाठी आक्रोश सुरू आहे. अशात काही लोक स्वत:त मस्त आहेत. भारतात कोरोनाचा कहर वाढताच भारत सोडून मालदीवमध्ये सुट्टी घालवण्यात हे लोक मस्त आहेत. भरीस भर म्हणजेच मालदीव व्हॅकेशनचे स्वत:चे ग्लॅमरस, बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याचा सपाटा लावला आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींचा यात समावेश आहे. या अशाच लोकांना अन्नू कपूर भडकले आहेत.
ट्विटरवर पोस्ट लिहून त्यांनी आपला राग व्यक्त केला आहे. (Annu Kapoor requests celebrities not to post luxury vacation photos amid corona pandemic)
I humbly appeal to rich and famous from all walks of life and media not to post their pictures vacationing at exotic locations while the most of the world suffers with pandemic
— ANNU KAPOOR (@annukapoor_) April 23, 2021
किसी को जला के मज़लूमों की बद्दुआ क्यों लेना ?
‘मी नम्रपणे सर्व क्षेत्रातील श्रीमंत व लोकप्रिय लोकांना विनंती करतो की, विदेशातील सुट्टीचे फोटो किमान अशा काळात पोस्ट करू नका. बहुतांश जग या महामारीची झळ सोसत आहे. किसी को जला के मजलूमों की बद्दुआ क्यों लेना?’, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.
अन्नू कपूर यांनी केलेल्या या ट्विटचे सध्या कौतुक होतेय. अनेकांनी त्यांच्या या मताशी सहमती दर्शवली आहे.
अन्नू कपूर लवकरच अमिताभ बच्चन व इमरान हाश्मीच्या ‘चेहरे’ या सिनेमात दिसणार आहेत.
दम है तो सोल्यूशन दो़....
काल अन्नू कपूर यांनी अशीच एक पोस्ट शेअर केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कवितेच्या काही ओळी पोस्ट केल्या होत्या.
ये गलत है वो गलत है वो गलत बोला
इसका मतलब तुम्हें बोध है गलत का !
तो सही की तलाश में जुट जाओ
वरना तुम्हारा , किसी को गलत ठहराना , बिना सही बताए ,
सिवाय मक्कारी चालाकी उपद्रव के अलावा कुछ नहीं होगा
दुनिया को confusion देने वालों की कमी नहीं
दम है तो solution दो, असे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले होते.