'राधा क्यो गोरी मैं क्यो काला' चित्रपटात आणखीन एका 'बिग बॉस' विजेत्याची वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 13:45 IST2018-10-27T13:43:29+5:302018-10-27T13:45:01+5:30

बिग बॉस १० चा विजेता मनवीर गुर्जर 'राधा क्यो गोरी मैं क्यो काला' या चित्रपटात झळकणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

 Another 'Bigg Boss' winner in 'Radha Kyo Gori Me Kyo Kala' movie | 'राधा क्यो गोरी मैं क्यो काला' चित्रपटात आणखीन एका 'बिग बॉस' विजेत्याची वर्णी

'राधा क्यो गोरी मैं क्यो काला' चित्रपटात आणखीन एका 'बिग बॉस' विजेत्याची वर्णी

ठळक मुद्दे मनवीर गुर्जर दिसणार खलनायकाच्या भूमिकेत

अभिनेत्री युलिया वंतूरचा आगामी चित्रपट 'राधा क्यो गोरी मैं क्यो काला' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात युलिया वंतूरसोबत 'बिग बॉस'च्या अकराव्या सीझनची विजेती शिल्पा शिंदेची वर्णी लागल्याची बातमी समोर आली होती. आता आणखी एका 'बिग बॉस' विजेत्याची या चित्रपटात एन्ट्री झाली आहे. बिग बॉस १० चा विजेता मनवीर गुर्जर हादेखील आता या चित्रपटात झळकणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'राधा क्यों गोरी मैं क्यों काला' चित्रपटात मनवीर मुख्य खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात युलिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यानंतर शिल्पा शिंदे सेकंड लीड रोलमध्ये पाहायला मिळणार आहे. पहा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असणार आहे. लूलिया या चित्रपटात एका कृष्ण भक्ताची भूमिका साकारत आहे. जी गीतेचे अध्याय वाचून भारताची संस्कृती अन् सभ्यता समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. भारतात तिला लोकांच्या गैरवर्तवणुकीचा सामना करावा लागतो. मात्र यानंतरही तिचा कृष्णभक्तीवरील विश्वास कायम असतो, अशी या चित्रपटाची कथा असणार आहे. 
या सिनेमाबाबत युलिया म्हणाली की, मी या चित्रपटात एका कृष्ण भक्ताची भूमिका साकारली आहे. ती गीतेचे अध्याय वाचते आणि भारताची संस्कृती व सभ्यता समजून घेण्याचा प्रयत्न करते आहे. भारतात तिच्यासोबत गैरवर्तुवणूक होते. मात्र तरीदेखील तिचा कृष्णाच्या भक्तीवरील विश्वास कायम असतो. अशी या सिनेमाची कथा आहे. तिने पुढे सांगितले की, मी भारतात आले तेव्हा मी ऋषिकेशला जाऊन आले आणि तिथे अधात्मचे दर्शन घेतले. 
या चित्रपटात लुलियासोबत जिम्मी शेरगीलही दिसणार आहे. ‘राधा क्यो गोरी मै क्यो काला’ हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title:  Another 'Bigg Boss' winner in 'Radha Kyo Gori Me Kyo Kala' movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.