‘बाहुबली- २’बाबत आणखी एक खुलासा; जाणून घ्या किती तासांचा असेल चित्रपट?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2017 11:07 AM2017-04-11T11:07:16+5:302017-04-11T16:37:16+5:30
२०१५ या वर्षातील सुपरडूपर हिट ठरलेला ‘बाहुबली’ या चित्रपटाचा सीक्वल ‘बाहुबली- २’ विषयी दर दिवसाला एक नवा खुलासा समोर ...
२ १५ या वर्षातील सुपरडूपर हिट ठरलेला ‘बाहुबली’ या चित्रपटाचा सीक्वल ‘बाहुबली- २’ विषयी दर दिवसाला एक नवा खुलासा समोर येत आहे. सध्या बाहुबलीची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यस्त असतानाच चित्रपटाविषयी होत असलेल्या खुलाशांमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी प्रचंड आतुरता निर्माण होत आहे. आतापर्यंत चित्रपटात बाहुबलीच्या भूमिकेत असलेल्या प्रभासच्या ट्रिपल रोलविषयीची माहिती समोर आली होती, आता हा चित्रपट किती तासांचा असेल याबाबतचा खुलासा करण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनीच हा खुलासा केल्याने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीच वाढली आहे.
श्रीधर पिल्लई यांना दिलेल्या एका मुलाखतीत राजामौली यांनी म्हटले की, पहिल्या चित्रपटाच्या तुलनेत ‘बाहुबली- २’ अधिक रोमांचक आहे. २ तास ५० मिनिटे म्हणजेच जवळपास तीन तासांच्या या चित्रपटात प्रेक्षकांना अखेरपर्यंत उत्सुकता लागलेली असेल. ‘बाहुबली- २’ हा चित्रपट तामीळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी अशा चार भाषांमध्ये रिलीज होणार आहे. दरम्यान, ‘बाहुबली- २’च्या ट्रेलरने यु-ट्यूबवर अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. त्यामुळे चित्रपट काय कमाल करेल, याविषयीचा अंदाज आता बांधला जात आहे.
दरम्यान, चित्रपटाच्या कालावधीविषयी जेव्हा राजामौली यांना विचारले तेव्हा त्यांनी म्हटले की, पहिल्या भागात चित्रपटातील सर्व पात्रांचा केवळ परिचय दाखविण्यात आला आहे. त्यामुळे दुसºया भागात खरी कथा रंगविण्यात आलेली आहे. शिवाय पहिल्या भागात प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांचा उलगडादेखील करण्यात आला आहे. यात प्रेक्षकांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे उत्तर असेल ते ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’
सूत्रानुसार ‘बाहुबली- २’ने रिलीज अगोदरच सुमारे ५०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. डिस्ट्रीब्यूशन आणि थिएट्रिकल रायट्स या माध्यमातून त्यांनी ही कमाई केल्याचे समजते. चित्रपटात प्रभास आणि राणा दुग्गुबाती यांच्या व्यतिरिक्त अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया, सत्यराज आदि कलाकार आहेत. येत्या २८ एप्रिल रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.