शब्दांचा 'बाजीगर' हरपला! 'मैने प्यार किया', 'हम आपके है कौन'च्या अजरामर गाण्यांचे गीतकार देव कोहली यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 10:53 AM2023-08-26T10:53:31+5:302023-08-26T10:53:47+5:30

Legendary Lyricist Dev Kohli : बॉलिवूडचे ज्येष्ठ गीतकार देव कोहली यांचे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.

Another shock to the film industry, the death of famous legendary lyricist Dev Kohli | शब्दांचा 'बाजीगर' हरपला! 'मैने प्यार किया', 'हम आपके है कौन'च्या अजरामर गाण्यांचे गीतकार देव कोहली यांचं निधन

शब्दांचा 'बाजीगर' हरपला! 'मैने प्यार किया', 'हम आपके है कौन'च्या अजरामर गाण्यांचे गीतकार देव कोहली यांचं निधन

googlenewsNext

हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे २४ ऑगस्टला निधन झाले. त्याच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. त्यानंतर आता कलाविश्वातील आणखी एका दिग्गज कलाकाराचे निधन झाले आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ गीतकार देव कोहली (Dev Kohli) यांचे आज, शनिवारी निधन झाले. देव यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.  गीतकार देव कोहली यांनी त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी मैंने प्यार किया, बाजीगर, जुडवा २, मुसाफिर, शूटआउट अॅट लोखंडवाला, टॅक्सी नंबर  नौ दो ग्यारह यांसारख्या १०० हून अधिक हिट चित्रपटांसाठी गाणी लिहिली. देव कोहली यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी मुंबईतील त्यांच्या घरी लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील ज्युपिटर अपार्टमेंटमध्ये दुपारी २ वाजता ठेवणार आहेत. संध्याकाळी ६ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.

देव कोहली यांना नुकतेच अंधेरीतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दोन-तीन महिन्यांपासून दाखल करण्यात आले होते. सर्व उपचार करूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. १० दिवसांपूर्वी त्यांना घरी पाठवण्यात आले. या ज्येष्ठ गीतकाराचे आज पहाटे ४ वाजता झोपेतच निधन झाले. देव कोहलीच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

देव कोहली यांचा जन्म २ नोव्हेंबर १९४२ रोजी झाला. ते १९४८ मध्ये दिल्लीत आले आणि नंतर १९४९ मध्ये देहरादूनला स्थलांतरित झाले. त्यांचे शिक्षण देहरादूनमध्ये झाले होते.  शंकर – जयकिशनपासून ते विशाल आणि शेखरपर्यंत, देव कोहली यांनी १९६९ ते २०१३ पर्यंतच्या कारकिर्दीत संगीतकारांच्या वेगवेगळ्या पिढ्यांसह काम केले. त्यांचे लोकप्रिय गाणे “गीत गाता हूं मैं” हे राजकुमार – हेमा मालिनी अभिनीत 'लाल पत्थर' (१९७१) मध्ये प्रदर्शित झाले. गीतकार म्हणून हा त्यांचा दुसरा चित्रपट होता. 'मैने प्यार किया'साठी त्यांना आणखी अठरा वर्षे वाट पाहावी लागली, जे गीतकार म्हणून त्यांचा मोठा ब्रेक ठरला. त्यानंतर, त्यांनी नव्वदच्या दशकात आणि २००० च्या दशकाच्या मध्यापर्यंत 'खिलाडी', 'राजू बन गया जेंटलमन', 'बाजीगर', 'हम आपके है कौन…!', 'आंतरराष्ट्रीय खिलाडी', 'कांटे' आणि 'मुसाफिर' यांसारखे असंख्य हिट चित्रपट दिले. त्यांची चलती है क्या ९ से १२, उंची है बिल्डिंग 2.0 - 'जुडवा 2', "आते जाते हंस्ते गाते" - 'गोलमाल अगेन', "ओ साकी साकी" - 'बाटला हाउस' अशी अनेक गाणी लोकप्रिय ठरली आहेत. 

Web Title: Another shock to the film industry, the death of famous legendary lyricist Dev Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.