‘मोटी भैंस’, ‘पपई’ म्हणणाºया ट्रोलर्सला अंगुरी भाभी ऊर्फ शिल्पा शिंदेने दिले उत्तर!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 12:18 PM2017-09-13T12:18:27+5:302017-09-13T17:48:27+5:30
एका आयटम नंबरमुळे चर्चेत आलेली शिल्पा शिंदे सध्या सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे. आता शिल्पाने ट्रोलर्सला उत्तर दिले आहे.
स ्या अंगुरी भाभी ऊर्फ शिल्पा शिंदे चांगलीच चर्चेत आहे. ‘भाबी जी घर पर है’ या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली शिल्पा शिंदे सध्या एका आयटम सॉँगमधून जबरदस्त तडका लावीत आहे. परंतु यामुळे तिला कॉन्ट्रोव्हर्सीचा सामना करावा लागत आहे. वास्तविक शिल्पा पहिल्यांदाच अशा प्रकारच्या कॉन्ट्रोव्हर्सीचा सामना करीत नाही, परंतु यावेळेचे प्रकरण थोडेसे पर्सनल आहे. होय, आयटम नंबरमध्ये आपल्या सौंदर्याच्या अदा दाखविणाºया शिल्पा तिच्या फिगरवरून ट्रोल होत आहे. सोशल मीडियावर तिला ‘मोटी भैंस, फॅट की दुकान, ओन्ली चर्बी हैं’ असे म्हटले जात आहे. आता शिल्पाने या ट्रोलर्स तिच्या अंदाजात फटकारले आहे. तिने म्हटले की, ‘काहीही असो पण मी वल्गर तर वाटत नाही’
ALSO READ : शिल्पा शिंदेच्या ‘लाइन मारो’ अंदाजावर चाहते नाखूश; म्हटले ‘ओन्ली चरबी है’!!
या प्रकरणाची सुरुवात आगामी ‘पटेल की पंजाबी शादी’ या चित्रपटातील आयटम डान्स नंबरने झाली. या चित्रपटाने शिल्पाने ‘मारो लाइन’ या गाण्यावर डान्स केला. गाण्यात अभिनेते ऋषी कपूर आणि वीर दासने यांनीही तिच्यासोबत ठुमके लावले. सोबत परेश रावल आणि प्रेम चोपडा हेदेखील गाण्यात दिसत आहेत. हे गाणे रिलीज होताच शिल्पाच्या फिगरवरून सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा रंगू लागली. अनेकांनी तिच्यावर विचित्र स्वरूपाच्या कॉमेण्ट केल्या. काहींनी तर तिला चक्क ‘मोटी भैंस’ असे म्हटले.
ट्रोल करणाºयांनी तिला ‘ओन्ली चरबी हैं’, ‘मोटी’ असे म्हटले. एका यूजरने लिहिले की, या आयटम नंबरमध्ये शिल्पा पपईसारखी दिसत आहे. अखेर शिल्पाने यूजर्सच्या या विचित्र कॉमेण्टला उत्तर दिले. एका न्यूज साइटशी बोलताना शिल्पाने म्हटले की, ‘मला माहीत आहे की, मी गाण्यात फॅट दिसत आहे. जेव्हा गाण्याची शूटिंग केली जात होती तेव्हा मी स्थूल होती. परंतु अशातही निर्मात्यांनी माझी या गाण्यासाठी निवड केली.
पुढे बोलताना अंगुरी भाभीने म्हटले की, ‘कमीत कमी मी वल्गर तर दिसत नाही. गाण्याच्या शूटिंगपासून आतापर्यंत मी सहा ते सात किलो वजन घटविले आहे. अशातही लोकांना माझ्या स्थूलपणावरून का गोंधळ घालत आहेत हे मला अजूनही समजले नाही. असो, हे गाणे करून मला खूप मज्जा आली. मला काही वेगळे वाटले नाही. मी कुठेही वल्गर दिसली नाही. कितीही ट्रोल करा माझ्यावर काहीच परिणाम होणार नसल्याचे शिल्पाने सांगितले.