इंडियन आयडॉलमध्ये अनेक महिन्यांनी परतला अनू मलिक, चाहते झाले खूश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 18:21 IST2021-03-17T18:15:38+5:302021-03-17T18:21:07+5:30
इंडियन आयडॉलमधील त्याचे परीक्षण त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असे. त्यामुळे ते आजही अनूला या कार्यक्रमात मिस करतात. आता अनू मलिकच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे.

इंडियन आयडॉलमध्ये अनेक महिन्यांनी परतला अनू मलिक, चाहते झाले खूश
ठळक मुद्देअनू मलिक इंडियन आयडॉलच्या आगामी भागात दिसणार आहे. त्याच्यासोबत गीतकार समीर, गायक उदित नारायण देखील हजेरी लावणार आहेत. या तिघांच्या अनेक गाण्यांनी ऐंशी-नव्वदचे दशक गाजवले आहे.
सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील लोकप्रिय सिंगिंग रिएलिटी शो इंडियन आयडॉलच्या १२व्या सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हर्ष आणि भारती हे जोडपे इंडियन आयडॉल १२चे पहिल्यांदाच सूत्रसंचालन करताना दिसत आहेत. या कार्यक्रमात दर आठवड्याला बॉलिवूडमधील सेलिब्रेटी हजेरी लावत असतात.
बॉलिवूडमधील हे सेलिब्रेटी इंडियन आयडॉलच्या स्पर्धकांचे मनोबल वाढवतात. तसेच त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से देखील सांगतात. संगीतकार-गायक अनू मलिकने इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या अनेक सिझनमध्ये परीक्षकाची भूमिका बजावली आहे. पण मीटू प्रकरणात अनू मलिकचे नाव आल्यानंतर या कार्यक्रमात तो दिसला नाही. पण इंडियन आयडॉलमधील त्याचे परीक्षण त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असे. त्यामुळे ते आजही अनूला या कार्यक्रमात मिस करतात. आता अनू मलिकच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे.
अनू मलिक इंडियन आयडॉलच्या आगामी भागात दिसणार आहे. त्याच्यासोबत गीतकार समीर, गायक उदित नारायण देखील हजेरी लावणार आहेत. या तिघांच्या अनेक गाण्यांनी ऐंशी-नव्वदचे दशक गाजवले आहे. ते तिघे त्यांच्या काळातील अनेक आठवणींना उजाळा देणार आहेत. तसेच स्पर्धकांना मार्गदर्शन देणार आहेत.