देशाचे तुकडे करणा-यांना फंड देणे बंद करा! ‘त्या’ ट्विटवरून अनुभव सिन्हा व अशोक पंडित यांच्यात जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 11:50 AM2020-06-07T11:50:56+5:302020-06-07T11:52:59+5:30
Twitter War! अनुभव सिन्हा यांच्या ट्विटला अशोक पंडित यांनी सणसणीत उत्तर दिले आहे.
मुल्क, आर्टिकल 15 असे सिनेमे देणारे दिग्दर्शक अनुभव सिन्हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय दिसतात. सध्या त्यांच्या एका ट्विटने खळबळ उडाली आहे. या ट्विटने ट्विटरवर एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.
होय, कालपरवा अनुभव सिन्हा यांनी एक ट्विट करत देशातील अल्पसंख्यांकांसमोर गुडघे टेकून दाखवण्याचे चॅलेंज केले होते. त्यांच्या या ट्विटवर चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी अनुभव सिन्हा यांना सणसणीत उत्तर दिले आहे.
चलिए कश्मीर से शुरुआत करिए और वहाँ के मुसलमानों के घुटने टिकवा कर माफ़ी मंगवाइए ! ४ लाख कश्मीरी हिन्दुओं को बेघर किया है उन लोगों ने ! फिर गांधी परिवार के घूटने टिकवा देना सिखों के नरसंघार के लिए ! लम्बी लिस्ट है भेजता रहूँगा ! https://t.co/ZnR9lzUaKQ
— Ashoke Pandit (@ashokepandit) June 5, 2020
काय होते अनुभव सिन्हा यांचे ट्विट
‘ मी भारतीयांना चॅलेंज करतो की देशातील अल्पसंख्यांकांच्या समोर गुडघे टेकून दाखवा. एक तारीख ठरवाच़ करु शकता? २ ऑक्टोबर रोजी? इतक्या वर्षांची माफी मागू शकता? ट्विटर आणि फेसबुकमधून बाहेर पडा,’ असे अनुभव सिन्हा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. नेमक्या त्यांच्या या ट्विटला अशोक पंडित यांनी सणसणीत उत्तर दिले आहे.
अशोक पंडित यांचे उत्तर
देश के टुकड़े करने वालों को फंड करना बंद कर दीजिए, असे अशोक पंडित यांनी अनुभव सिन्हा यांना सुनावले. केवळ इतकेच नाही एकापाठोपाठ तीन ट्विट केलेत.
‘चला काश्मिरपासून सुरुवात करा आणि तेथील मुस्लिमांना गुडघे टेकून माफी मागायला लावा. चार लाख काश्मिरी हिंदूंना बेघर केले या लोकांनी. मग शिखांच्या नरसंहारासाठी गांधी परिवाराा गुडघे टेकवायला लावा. लांब यादी पाठवतो,’ अशा शब्दांत अशोक पंडित यांनी अनुभव सिन्हांवर निशाणा साधला.
दोस्त हम एक ऐसे इंडस्ट्री को बिलोंग करते हैं जहाँ हज़ारों सिख मुसलमान, सिख, इसायी , हिंदू और अन्य क़ौम के लोग एक साथ प्यार से काम करते हैं ! ठीक इसी तरह देश में भी सब मिल कर रहते हैं ! देश के टुकड़े करने वालों को फ़ंड करना बंद कर दीजिए ! https://t.co/ZnR9lzUaKQ
— Ashoke Pandit (@ashokepandit) June 5, 2020
‘आपण अशा इंडस्ट्रीत काम करतो, जिथे सर्व धर्माचे लोक आनंदाने एकत्र काम करतात. असेच देशातही सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. देशाचे तुकडे करणा-यांना फंड देणे बंद करायला हवे,’ असेही दुस-या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले.