​डिप्रेशनमधून जाणा-यांसाठी अनुपम खेर आणणार वेबसाईट!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2017 09:19 AM2017-04-12T09:19:49+5:302017-04-12T14:49:49+5:30

इंजिनिअरचा विद्यार्थी अर्जुन भारद्वाज याच्या आत्महत्येचे अख्खे समाजमन ढवळून निघाले. अभिनेते अनुपम खेर हेही या आत्महत्येने अंर्त:बाह्य हादरवून गेले. ...

Anupam Kher website for the Depression! | ​डिप्रेशनमधून जाणा-यांसाठी अनुपम खेर आणणार वेबसाईट!

​डिप्रेशनमधून जाणा-यांसाठी अनुपम खेर आणणार वेबसाईट!

googlenewsNext
जिनिअरचा विद्यार्थी अर्जुन भारद्वाज याच्या आत्महत्येचे अख्खे समाजमन ढवळून निघाले. अभिनेते अनुपम खेर हेही या आत्महत्येने अंर्त:बाह्य हादरवून गेले. पण इथेच न थांबता अशा नैराश्याने ग्रासलेल्या लोकांसाठी रचनात्मक कार्य करण्याचे अनुपम यांनी ठरवले आहे. होय, अनुपम खेर लवकरच एकटेपणाने ग्रासलेल्या आणि नैराश्याने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी एक वेबसाईट सुरु करणार आहेत. अलीकडे एका मुलाखतीत एकटेपण आणि तणावग्रस्तांसाठी एक वेबसाइटदेखील सुरु करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

  मी सतत विद्यार्थ्यांशी बोलत असतो. तरूणाईसाठी घेतल्या जाणाºया अनेक कार्यशाळांना जात असतो. त्यामुळे मी नैराश्यग्रस्तांची स्थिती समजू शकतो. अर्जुन भारद्वाजच्या आत्महत्येचे वृत्त माझ्यासाठी धक्कादायक होते. केवळ सोशल मीडियावर यावर चर्चा करणे पुरेसे नाही. तर अशा घटना रोखण्यासाठी, नैराश्याने पीडित असलेल्या लोकांसाठी काहीतरी ठोस करायला हवे, असे मला वाटतेय. म्हणूनच मी वेबसाईट सुरु करण्याच्या विचारात आहे.  एक ते दीड महिन्यांत ही वेबसाईट सुरु होईल. या वेबसाईटच्या माध्यमातून नैराश्येत असणाºयाचे समुपदेशन केले जाईल, असे त्यांनी सांगितले. अनुपम यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन  ई-मेलआयडी शेअर  करत, तणावात असणाºया लोकांनी मनमोकळेपणाणे संवाद करावा, असे आवाहन  केले होते. याबद्दल त्यांनी सांगितले की, माझा ई-मेल आयडी शेअर केल्यानंतर मला तब्बल ३०० मेल आले. अनेक  ई-मेलमधील समस्या  गंभीर स्वरुपाच्या आहेत. यामध्ये फक्त तरुणांनीच नव्हे, तर विवाहित महिला, आई, वडील यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. एका मुलीने वडिलांच्या तणावातील समस्येवर माझ्याकडे विचारणा केली. ते तणावात आहेत हे जाणवते, पण त्यांना मी कशी मदत करु? असा प्रश्न तिने मला विचारला आहे.

Web Title: Anupam Kher website for the Depression!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.