​अनुपम खेर असतील एफटीआयआयचे नवे अध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 10:06 AM2017-10-11T10:06:31+5:302017-10-11T15:36:31+5:30

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बुधवारी केंद्रीय माहिती ...

Anupam Kher will be the new president of FTII | ​अनुपम खेर असतील एफटीआयआयचे नवे अध्यक्ष

​अनुपम खेर असतील एफटीआयआयचे नवे अध्यक्ष

googlenewsNext
येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बुधवारी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने ही घोषणा केली. गजेन्द्र चौहान यांच्या जागी अनुपम यांची वर्णी लागली आहे. अनुपम यांच्या पत्नी खासदार किरण खेर यांनी सरकारच्या या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुपमवर विश्वास टाकला. मला याचा आनंद आहे,अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
गजेन्द्र चौहान यांची २०१५ मध्ये एफटीआयआयचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पण पहिल्या दिवसापासूनच त्यांची नियुक्ती वादात सापडली होती. एफटीआयचे विद्यार्थी त्यांच्या नियुक्तीविरोधात रस्त्यावर उतरले होते. तब्बल १३९ दिवसांचा संप पुकारत, गजेन्द्र चौहान यांच्या हकालपट्टीची मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली होती. गजेन्द्र या पदासाठी पात्र नाहीत, असा विद्यार्थ्यांचा दावा होता. पण  इतका विरोध स्वीकारूनही गजेन्द्र चौहान मात्र ठाम राहिले. सरकारही त्यांची पाठराखण करताना दिसले. सगळा दबाव झुगारत गजेन्द्र चौहान यांनी आपल्या पदाचा कार्यकाळ पूर्ण केला. गजेन्द्र चौहान यांनी ‘महाभारत’ या मालिकेत युधिष्ठिरची भूमिका साकारली होती. या भूमिकेव्यतिरिक्त नावाजलेली अशी एकही भूमिका त्यांच्या नावावर नाही.  याऊलट अनुपम खेर यांनी चरित्र अभिनेते म्हणून बॉलिवूडमध्ये दीर्घकाळ आपली छाप पाडली आहे. त्यांनी पाचशे हून अधिक चित्रपटांमधून काम केले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांतही त्यांनी यादगार भूमिका वठवल्या आहेत. ‘कर्मा’, ‘चायना गेट’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएँगे’, ‘कुछ कुछ होता है’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट.   २०१४ साली चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी भारत सरकारने खेर यांना पद्मश्री पुरस्कारने गौरविले गेले होते. यानंतर २०१६ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. खरे तर अनुपम यांनी प्रत्येक प्रकारची भूमिका साकारली आहे. पण विनोदी भूमिकांसाठी ते ओळखले जातात. फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकाराच्या पुरस्कारावर त्यांनी सहा वेळा नाव कोरले आहे.
यापूर्वी अनुपम खेर यांनी सीबीएफसी व नॅशनल स्कूल आॅफ ड्रामाचे अध्यक्ष राहून चुकले आहेत.

Web Title: Anupam Kher will be the new president of FTII

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.