त्या महिलेच्या दाव्यावर अनुराधा पौडवाल यांनी भडकून दिले हे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 06:04 PM2020-01-03T18:04:00+5:302020-01-03T18:08:56+5:30

अनुराधा पौडवाल आपली आई असल्याचा दावा एका महिलेने केला आहे.

Anuradha Paudwal on Kerala Woman Claiming to be Her Daughter: I Don't Clarify Idiotic Statements | त्या महिलेच्या दाव्यावर अनुराधा पौडवाल यांनी भडकून दिले हे उत्तर

त्या महिलेच्या दाव्यावर अनुराधा पौडवाल यांनी भडकून दिले हे उत्तर

googlenewsNext
ठळक मुद्देअनुराधा पौडवाल यांनी सांगितले की, या महिलेला केवळ पैसे उकळायचे असल्याने ही महिला असे आरोप करत आहे. या महिलेचे मानसिक संतुलन बहुधा बिघडलेले असेल असे देखील त्यांनी म्हटले आहे.

केरळमधील एका महिलेने 67 वर्षांच्या अनुराधा पौडवाल यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. अनुराधा पौडवाल आपली आई असल्याचा दावा या महिलेने केला आहे. अनुराधा आपली आई असल्याचा दावा करणारी ही महिला तिरूवनंतपूरमची राहणारी आहे. करमाला मोडेक्स हे तिचे नाव असून या 45 वर्षाच्या महिलेने अनुराधा पौडवाल यांच्याविरोधात तिरुअनंतपुरम येथील कौटुंबिक न्यायालयात खटला दाखल केला आहे. अनुराधा यांच्याकडून तिने 50 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचीही मागणी केली आहे.

या सगळ्या प्रकरणावर आता अनुराधा पौडवाल यांनी मौन सोडले असून त्यांनी दैनिक भास्करशी बोलताना सांगितले की, या महिलेला केवळ पैसे उकळायचे असल्याने ही महिला असे आरोप करत आहे. या महिलेचे मानसिक संतुलन बहुधा बिघडलेले असेल असे देखील त्यांनी म्हटले आहे. एखादा कुत्रा भुंकत असेल तर तुम्ही माझ्याकडूनही भुंकण्याची अपेक्षा करू शकत नाही. तसेच कोर्टाने कोणत्या आधारावर हे प्रकरण दाखल करून घेतलं हेच कळत नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

करमालाच्या दाव्यानुसार, तिचा जन्म 1974 साली झाला होता. ती अवघी चार दिवसांची असताना, अनुराधा यांनी तिला पोन्नाचन आणि अ‍ॅग्नेस या दांपत्याला दिले होते. करमालाने एका मुलाखतीत सांगितले की, ‘मला जन्म देणारी आई अनुराधा पौडवाल असल्याचे मला पाच वर्षांपूर्वी कळले. माझ्या वडिलांनी मृत्यूपूर्वी मला हे सत्य सांगितले. मी चार दिवसांची असताना अनुराधा यांनी मला माझे पालक पोन्नाचन आणि अ‍ॅग्नेस यांच्याकडे मला सोपवले होते. माझे वडील आर्मीत होते आणि महाराष्ट्रात कर्तव्यावर होते. ते अनुराधा यांचे चांगले मित्र होते. कालांतराने त्यांची बदली केरळमध्ये झाली. अनुराधा त्यावेळी आपल्या करिअरमध्ये बिझी होत्या आणि बाळाची जबाबदारी घेण्याची त्यांची तयारी नव्हती, त्यामुळे त्यांनी मला दुसऱ्याला सोपवले. पण आता मला माझी आई परत हवीय.’

वडिलांच्या तोंडून सत्य ऐकल्यानंतर करमालाने अनुराधाशी फोनवरुन बऱ्याच वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, समोरून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर करमालाचा नंबर ब्लॉक करण्यात आला.

Web Title: Anuradha Paudwal on Kerala Woman Claiming to be Her Daughter: I Don't Clarify Idiotic Statements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.