अनुराग बासूवर का बरसले ऋषी कपूर?...वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2017 11:16 AM2017-07-24T11:16:06+5:302017-07-24T16:46:06+5:30

रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांचा जग्गा जासूस बॉक्स ऑफिसवर आपली तग धरु शकलेला नाही. चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटल्यामुळे ...

Anurag Basuar ke rishi rishi kapoor? ... read detailed | अनुराग बासूवर का बरसले ऋषी कपूर?...वाचा सविस्तर

अनुराग बासूवर का बरसले ऋषी कपूर?...वाचा सविस्तर

googlenewsNext
बीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांचा जग्गा जासूस बॉक्स ऑफिसवर आपली तग धरु शकलेला नाही. चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटल्यामुळे ऋषी कपूरने चित्रपटाचा दिग्दर्शक अनुराग बासूवा धारेवर धरले आहे. चित्रपट फ्लॉप होण्याचे सगळे खापर ऋषी कपूरने अनुराग बासूच्या माथी मारले आहे. ऋषी कपूर यांने अनुरागला गैर जिम्मेदार म्हटले आहे. ''चित्रपटाच्या रिलीजच्या आदल्या दिवसापर्यंत चित्रपटाचे काम सुरु होते. संगीतकार प्रितमने एक आठवड्यापूर्वीचे जग्गा जासूसचे म्युझिक पूर्ण झाले होते. चित्रपट माझ्या मुलामुळे नाही तर अनुराग बासूमुळे फ्लॉप झाला.'' 
आपल्या बाबांचे म्हणणे रणबीर कपूरला फारसे रुचले नसल्याचे सूत्रांकडून कळते आहे. रणबीर कपूर जग्गा जासूसच्या  फ्लॉप होण्याला घेऊन कोणतीच कॉन्ट्रोव्हर्सी नकोय. रणबीरचे म्हणणे आहे गेल्या अनेक वर्षांपासून तो अनुराग सोबत काम करतो आहे. ऋषी कपूरच्या या वागण्याचा परिणाम माझ्या आणि अनुरागच्या अनेक वर्षांच्या नात्यावर होईल असे रणबीरचे म्हणणे आहे. 
चित्रपट बघितल्यावर ऋषी कपूरचे म्हणणे होते की चित्रपटाला 20 मिनिट जरबदस्ती खेचण्यात आले आहे. गोविंदाचे सीन्स कट करायचे होते ते त्याला शूटिंगसाठी बोलवलच का? यामुळे माझ्या मुलाचे नाव खराब झाले आहे. अनुरागच्या चुकीमुळे रणबीरला ऐकावं लागले. रणबीर या चित्रपटाचा निर्माता आहे. जग्गा जासूसकडून रणबीरला खूप अपेक्षा होत्या. या चित्रपटाच्या प्रमोशनची रणबीर आणि कॅटरिनाने एक ही संधी सोडली नव्हती. ब्रेकअप नंतर त्यांची केमिस्ट्री बघण्यासाठी त्यांचे फॅन्स उत्सुक होते. मात्र या सगळ्यांची घोर निराशा झाली. रणबीर आणि कॅटरिनाचा त्यांच्या ब्रेकअपनंतर आलेला हा पहिलाच चित्रपट आहे.   

Web Title: Anurag Basuar ke rishi rishi kapoor? ... read detailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.