दोनदा घटस्फोट तरीही तिस-यांदा प्रेमात पडला हा स्टार, 22 वर्षांनी लहान तरूणीला करतोय डेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 02:15 PM2019-09-10T14:15:39+5:302019-09-10T14:16:02+5:30

होय, दोन घटस्फोटानंतर 47 वर्षांचा हा स्टार स्वत:हून 22 वर्षांनी लहान तरूणीच्या प्रेमात पडला. त्याच्या या प्रेमप्रकरणाची बरीच चर्चा झाली.

anurag kashyap birthday dating 22 year younger girlfriend | दोनदा घटस्फोट तरीही तिस-यांदा प्रेमात पडला हा स्टार, 22 वर्षांनी लहान तरूणीला करतोय डेट

दोनदा घटस्फोट तरीही तिस-यांदा प्रेमात पडला हा स्टार, 22 वर्षांनी लहान तरूणीला करतोय डेट

googlenewsNext
ठळक मुद्देशुभ्राने मुंबईच्या सेंट जेवियर कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. तूर्तास ती अनुरागच्या ‘फँटम फिल्म्स’ या प्रॉडक्शन कंपनीत काम करतेय.

दिग्दर्शक अनुराग कश्यप याचा आज वाढदिवस. आज अनुराग त्याचा 47 वा वाढदिवस साजरा करतोय. अनुरागचे अनेक चित्रपट गाजलेत. पण त्याहीपेक्षा अधिक गाजले ते त्याचे खासगी आयुष्य. होय, दोन घटस्फोटानंतर 47 वर्षांचा अनुराग स्वत:हून 22 वर्षांनी लहान तरूणीच्या प्रेमात पडला आणि त्याच्या या प्रेमप्रकरणाची बरीच चर्चा झाली.
होय, 2003 मध्ये अनुरागचे पहिले लग्न झाले. आरती बजाजसोबत अनुरागने लग्न गाठ बांधली. पण 2009 मध्ये त्याचा व आरतीचा घटस्फोट झाला. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर 2011 मध्ये अभिनेत्री कल्की कोच्लीनच्या प्रेमात पडला. दोघांनी लग्न केले. पण पाच वर्षांत कल्कीसोबतही त्याचा घटस्फोट झाला.
दोन घटस्फोटानंतर अनुराग पुन्हा प्रेमात पडला. ते सुद्धा स्वत:हून 22 वर्षांनी लहान तरूणीच्या. या तरूणीचे नाव आहे शुभ्रा शेट्टी.

डिसेंबर २०१५ मध्येच अनुराग व शुभ्राच्या अफेअरच्या चर्चा कानावर आल्या होत्या. यानंतर जुलै २०१६ मध्ये अनुराग व शुभ्राच्या रिलेशनची चर्चा झाली होती. यावेळी दोघांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यात अनुराग शुभ्राचे चुंबन घेताना दिसला होता. 

डिझाईनर मसाबा हिच्या संगीत सेरेमनीत स्वत: अनुरागने शुभ्राचा एक फोटो शेअर केला होता. तेव्हापासून अनुराग व शुभ्रा एकमेकांना डेट करत असल्याचे मानले गेले होते. अर्थात अफेअरच्या या बातम्यांनी अनुराग चांगलाच संतापला होता. केवळ संतापलाच नाही तर त्याने या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे म्हटले होते. पण नंतर एका मुलाखतीत त्याने या नात्याची कबुली दिली होती.

सर्वांना प्रेम करण्याचा अधिकार आहे. मी प्रेमाचा आदर करतो. वयाच्या नव्वदीतही तुम्ही प्रेमात पडू शकता. ब्रेकअपनंतर दु:खी होऊन जगण्यापेक्षा मी प्रेमात पडण्यावर विश्वास ठेवतो, असे तो म्हणाला होता.

शुभ्रा शेट्टी ही अनुरागपेक्षा 22 वर्षांनी लहान आहे. शुभ्राने मुंबईच्या सेंट जेवियर कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. तूर्तास ती अनुरागच्या ‘फँटम फिल्म्स’ या प्रॉडक्शन कंपनीत काम करतेय.


 

Web Title: anurag kashyap birthday dating 22 year younger girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.