बेफिक्रे!! अनुराग कश्यपच्या लेकीने शेअर केले बॉयफ्रेन्डसोबतचे पर्सनल फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 01:41 PM2021-11-10T13:41:07+5:302021-11-10T13:43:06+5:30
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप बॉलिवूडमध्ये अॅक्टिव्ह नाही. पण म्हणून तिची चर्चा कमी नाही. सध्या आलिया एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपची (Anurag Kashyap )मुलगी आलिया कश्यप (Aaliyah Kashyap) बॉलिवूडमध्ये अॅक्टिव्ह नाही. पण म्हणून तिची चर्चा कमी नाही. सध्या आलिया एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. होय, सध्या तिच्या लव्ह लाईफच्या चर्चा जोरात आहेत. अनुराग कश्यप बिनधास्त आणि स्वत:च्या अटींवर जगणारा माणूस. हाच गुण त्याची लेक आलियात उतरला आहे. तिच्या पर्सनल लाईफबद्दल तरी हेच म्हणतात येईल. आलिया तिची पर्सनल लाईफ कधीही लपवत नाही. पण आता काय तर तिने बॉयफ्रेन्ड शेन ग्रीगोइरेसोबतचे काही इंटिमेट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आलिया व शेन हॉटेलच्या एका रूममध्ये क्वालिटी टाईम घालवताना दिसत आहेत. दोघंही हॉटेलच्या बेडवर आहेत आणि दोघांच्याही अंगात पांढरा बाथरोब आहे.
पहिल्या फोटोत आलिया व शेन एकमेकांकडे पाहून हसताना दिसत आहेत तर दुस-या फोटोत दोघंही लिपलॉक करताना दिसत आहेत.
‘रोमॅन्टिक गेटवे’ असं कॅप्शन देत आलियाने हे फोटो शेअर केले आहेत.
शेन व आलिया सर्वप्रथम एका डेटींग अॅपवर भेटले होते. यानंतर दोन महिने दोघेही एकमेकांसोबत बोलत होते. 2 महिन्यानंतर दोघांनी प्रत्यक्ष भेटण्याचा निर्णय घेतला. या पहिल्या डेटवर शेन आपल्याला किस करेल, अशी आलियाची अपेक्षा होती. पण शेन पुढाकार घेईना, मग काय तर आलियालाच पुढाकार घ्यावा लागला होता. याचा अनुभवही तिने सोशल मीडियावर शेअर केला होता.
आलिया ही अनुराग आाणि त्याची पत्नी आरती बजाजची मुलगी आहे. आलिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिचे हॉट व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.