लग्नानंतर अनुराग कश्यपची लाडकी लेक 'या' ठिकाणी गेली हनीमूनला, शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 10:25 IST2024-12-18T10:23:49+5:302024-12-18T10:25:05+5:30

आलियाने इन्स्टाग्रामवर हनिमून ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत.

Anurag Kashyap Daughter Aaliyah Shares Honeymoon Photos With Her Husband From Maldives | लग्नानंतर अनुराग कश्यपची लाडकी लेक 'या' ठिकाणी गेली हनीमूनला, शेअर केले फोटो

लग्नानंतर अनुराग कश्यपची लाडकी लेक 'या' ठिकाणी गेली हनीमूनला, शेअर केले फोटो

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपची लेक आलिया  (Aaliyah Kashyap) नुकतेच तिच्या बॉयफ्रेंड शेन ग्रेगॉयर (Shane Gregoire) सोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. मुंबईत दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडला. मेहंदी, हळदी, लग्न हे सगळे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत. आता नवविवाहित जोडपे हे हनीमूनला गेलं आहे. आलियाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर फोटो शेअर करून तिच्या हनीमूनची माहिती दिली आहे.

आलिया ही तिच्या पतीसोबत मालदिव येथे गेले आहेत. आलियाने इन्स्टाग्रामवर मालदीवमधील तिच्या हनिमून ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये समुद्राच्या सुंदर लाटा, सुंदर सायंकाळ आणि समुद्रकिनारी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. एका फोटोत आलियाच्या हातावर मेहंदी दिसत आहे आणि शेनने तिचा हात पकडलेला आहे.


आलियाचा पती हा एक अमेरिकन बिझनेस मॅन आहे. त्याचं एक युट्यूब चॅनलदेखील आहे. आलिया कश्यप आणि शेन ग्रेगोयर गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.  लॉकडाऊनपासूनच ते एकत्र राहतही होते. गेल्या वर्षी त्यांनी गुपचूप साखरपुडाही केला होता. आलिया २३ वर्षांची असून शेन ग्रेगोयर २४ वर्षांचा आहे. 
 

Web Title: Anurag Kashyap Daughter Aaliyah Shares Honeymoon Photos With Her Husband From Maldives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.