अनुराग कश्यपच्या लेकीला हळद लागली! परदेशी बॉयफ्रेंडसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2024 06:01 PM2024-12-08T18:01:54+5:302024-12-08T18:02:14+5:30
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या घरीदेखील सनई चौघडे वाजत आहेत. अनुराग कश्यपची लेक आलिया लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तिच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत.
सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. तर काही बोहल्यावर चढण्यात आहेत. बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या घरीदेखील सनई चौघडे वाजत आहेत. अनुराग कश्यपची लेक आलिया लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तिच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत.
अनुराग कश्यपची लेक आलियाची लगीनघाई सुरू आहे. नुकताच तिचा हळदीचा कार्यक्रम पार पडला. याचे फोटो अनुराग कश्यपने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. आलियाच्या हळदीला बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या फोटोमध्ये खुशी कपूरही दिसत आहे. आलिया बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरशी लग्न करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ११ डिसेंबरला मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.
आलिया कश्यप आणि शेन ग्रेगोयर गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. गेल्या वर्षी त्यांनी गुपचूप साखरपुडाही केला होता. त्यानंतर आता ते लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. आलिया २३ वर्षांची असून शेन ग्रेगोयर २४ वर्षांचा आहे. तो एक अमेरिकन उद्योजक आहे.