अनुराग कश्यपवरील आरोपाबाबत त्याची एक्स-वाइफ आरती बजाजकडून पोस्ट, म्हणाली....

By अमित इंगोले | Published: September 21, 2020 10:44 AM2020-09-21T10:44:36+5:302020-09-21T10:57:31+5:30

पायल घोषकडून करण्यात आलेल्या आरोपाला आरतीने आतापर्यंतचा सर्वात घाणेरडा स्टंट म्हटलं आहे. इतकेच नाही तर आरतीने अनुरागला पोस्टमधून तू रॉकस्टार असल्याचं म्हटलंय.

Anurag Kashyap ex-wife Aarti Bajaj slams allegations against him | अनुराग कश्यपवरील आरोपाबाबत त्याची एक्स-वाइफ आरती बजाजकडून पोस्ट, म्हणाली....

अनुराग कश्यपवरील आरोपाबाबत त्याची एक्स-वाइफ आरती बजाजकडून पोस्ट, म्हणाली....

googlenewsNext

बॉलिवूडमधील सिने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक अत्याचाराचा आरोप लावल्यावर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीसोबतच अनुरागची एक्स-वाइफ आरती बजाजही त्याच्या समर्थनात समोर आली आहे. पायल घोषकडून करणयात आलेल्या आरोपाला आरतीने आतापर्यंतचा सर्वात घाणेरडा स्टंट म्हटलं आहे. इतकेच नाही तर आरतीने अनुरागला पोस्टमधून तू रॉकस्टार असल्याचं म्हटलंय.

आरती बजाजची इन्स्टा पोस्ट

आरती बजाजने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिले की, 'अनुराग कश्यप तू रॉकस्टार आहेस. ज्याप्रकारे तू महिलांना सशक्त करतो, तसं करणं आणि त्या सर्वांसाठी सुरक्षित स्थळ तयार करणं सुरू ठेव. हे मी सर्वातआधी आपल्या मुलीत बघते. जगात जराही इमानदारी शिल्लक राहिलेली नाही आणि जगात बेकार लोक भरलेले आहेत. जर हे लोक त्यांच्या ऊर्जेचा वापर द्वेष पसरवण्यात लावत नसते आणि त्याचा रचनात्मक वापर झाला असता तर जग आणखी चांगलं झालं असतं.

आधी राग मग हसू...

आरती बजाजने लिहिले की, 'आतापर्यंतचा हा सर्वात घाणेरडा स्टंट होता. यावर मला आधी राग आला आणि नंतर हसू आलं. मला वाईट वाटतंय की, तुला यातून जावं लागतंय. हीच त्यांची लेव्हल आहे. नेहमी उंचीवर रहा आणि आपला आवाज उठवणं सुरू ठेव. आमचं तुझ्यावर प्रेम आहे'.

काय म्हणाली होती पायल?

पायल घोषने ट्विट करत लिहिले होते की, 'अनुराग कश्यपने माझ्यासोबत जबरदस्ती केली आणि गैरवर्तन केलं. पीएमओ आणि नरेंद्र मोदीजी यावर अ‍ॅक्शन घ्या. या क्रिएटीव्ह व्यक्तीच्या मागे लपलेला राक्षस देशाला दाखवा. मला हे माहीत आहे की, तो मला नुकसान पोहोचवू शकतो आणि माझी सुरक्षा धोक्यात आहे. कृपया माझी मदत करा'.

अनुरागने फेटाळले आरोप

अनुराग कश्यपने या आरोपानंतर प्रतिक्रिया दिली आहे. अनुरागने एकापाठोपाठ एक ट्विट करत या आरोपांना उत्तर दिले़. थोडी तर मर्यादा बाळगा, जे काही आरोप आहेत ते बिनबुडाचे, निराधार आहेत, असे अनुरागने म्हटले. त्याने लिहिे की, 'क्या बात है, मला चूप करण्यासाठी इतका वेळ घेतला. काही हरकत नाही. पण मला चूप करण्यासाठी इतके खोटे बोललात की, दुस-या महिलांनाही यात ओढले. थोडी मर्यादा ठेवा मॅडम. मी फक्त एवढेच म्हणेल की, जे काही आरोप आहेत ते सगळे निराधार आहेत', असे पहिले ट्विट अनुरागने केले.

हे पण वाचा :

पायल घोषच्या आरोपांवर भडकली माही गिल, अनुराग कश्यपला केला सपोर्ट

तू सर्वांत मोठा स्त्रीवादी...! तापसी पन्नू अनुराग कश्यपसाठी मैदानात उतरली अन् ट्रोल झाली

Web Title: Anurag Kashyap ex-wife Aarti Bajaj slams allegations against him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.