आलिया भटच्या आईने अनुराग कश्यपला दिला ट्रोलर्सशी निपटण्याचा कानमंत्र!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 01:44 PM2019-04-12T13:44:55+5:302019-04-12T13:46:08+5:30
दिग्दर्शक अनुराग कश्यप बेधडक बोलणारा दिग्दर्शक आहे. साहजिकच सोशल मीडियावर तो आल्या दिवशी ट्रोल होतो. सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुराग ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलणे अनुरागला महागात पडतेय. पण आता चिंता नाही.
दिग्दर्शक अनुराग कश्यप बेधडक बोलणारा दिग्दर्शक आहे. साहजिकच सोशल मीडियावर तो आल्या दिवशी ट्रोल होतो. सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुराग ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलणे अनुरागला महागात पडतेय. पण आता चिंता नाही. होय, कारण आलिया भटची आई सोनी राजदान यांनी या ट्रोलर्सपासून वाचण्यासाठी अनुरागला एक चांगला कानमंत्र दिला आहे.
‘मी ट्वीटरवर आलो आणि अनेक ‘चौकीदार’ मला शिव्याशाप देऊ लागले. काय हे ‘चौकीदार’ आपली व आपल्या देशाची सुरक्षा करतील? ख-या ‘चौकीदार’वर कोण लक्ष ठेवणार?’, असे ट्वीट अनुरागने केले. त्याच्या या ट्वीटनंतर सोनी राजदान समजायच्या त्या समजल्या आणि त्यांनी लगेच अनुरागला या ट्रोलर्सपासून निपटण्याचा कानमंत्र दिला. ‘अनुराग, तू माझे ते टिष्ट्वटबघ, ज्यात ट्रोलर्सला म्यूट करण्याची मार्ग सांगितला आहे. हा एक साधासोपा सरळ मार्ग आहे,’असे सोनी राजदान यांनी लिहिले.
Anurag see my tweet on how to mute them. Such an easy thing to do.
— Soni Razdan (@Soni_Razdan) 8 अप्रैल 2019
अनुरागने सोनी राजदान यांचे हे ट्वीट वाचले आणि लगेच त्यांचे आभार मानलेत. आता फक्त आलियाच्या आईचा हा सल्ला अनुरागच्या किती कामात येतो, तेच बघायचेय.
गतवर्षी आलेला अनुराग कश्यपच्या ‘मनमर्जियां’ हा चित्रपट बराच चर्चेत राहिला. मात्र बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. पण या चित्रपटातील कलाकारांच्या अदाकारीचे प्रचंड कौतुक झाले. अभिषेक बच्चन, विकी कौशल आणि तापसी पन्नू यात मुख्य भूमिकेत होते. या तिघांच्याही अभिनयाने प्रेक्षक व समीक्षकांची मने जिंकली. या चित्रपटानंतर अनुराग कश्यपने पुन्हा एका नव्या चित्रपटाची तयारी सुरु केली आहे आणि त्याच्या या चित्रपटात पुन्हा एकदा तापसी पन्नूची वर्णी लागली आहे. तापसी व अनुराग एका सुपरनॅचरल थ्रीलर चित्रपटात एकत्र काम करणार आहे. अनुराग व तापसीच्या या आगामी चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. पण हा चित्रपट सुनीर क्षेत्रपाल प्रोड्यूस करणार आहेत.