Anurag Kashyap : हेच आधी बोलला असता तर..., मोदींनी दिलेल्या ‘त्या’ सल्ल्यावर अनुराग कश्यप स्पष्टच बोलला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 04:32 PM2023-01-19T16:32:54+5:302023-01-19T16:34:54+5:30

Anurag Kashyap : नेत्यांनी चित्रपटाबद्दल अनावश्यक वक्तव्य करण्यापासून दूर राहिलं पाहिजे, असं पंतप्रधान मोदी  म्हणाले. आता मोदींच्या या वक्तव्यावर दिग्दर्शक अनुराग कश्यपने आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

anurag kashyap on pm narendra modi politicians commenting on bollywood | Anurag Kashyap : हेच आधी बोलला असता तर..., मोदींनी दिलेल्या ‘त्या’ सल्ल्यावर अनुराग कश्यप स्पष्टच बोलला

Anurag Kashyap : हेच आधी बोलला असता तर..., मोदींनी दिलेल्या ‘त्या’ सल्ल्यावर अनुराग कश्यप स्पष्टच बोलला

googlenewsNext

 शाहरुख खान याच्या 'पठाण' हा सिनेमा येत्या २५ जानेवारीला चित्रपटगृहांत धडकणार आहे. त्याआधी या चित्रपटावरून निर्माण झालेला वाद तुम्ही बघितलाच. 'पठाण'चं 'बेशरम रंग' हे गाणं रिलीज झालं आणि या गाण्यानं वाद ओढवून घेतला. या गाण्यात दीपिका पादुकोणने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे एकच गदारोळ निर्माण झाला. चित्रपटाविरोधात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले. सोशल मीडियावर बॉयकॉट पठाण हे कॅम्पेन चालवण्यात आलं. अशात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रपटांवरून नाहक वाद निर्माण करणाऱ्यांची कानउघाडणी केली.  

“आपण दिवसभर काम करत असतो. तर, काहीजण चित्रपटांबद्दल विधानं करत असतात. याची दिवसभर माध्यमांत चर्चा होत राहते. त्यामुळे नेत्यांनी चित्रपटाबद्दल अनावश्यक वक्तव्य करण्यापासून दूर राहिलं पाहिजे,” असं पंतप्रधान मोदी  म्हणाले. आता मोदींच्या या वक्तव्यावर दिग्दर्शक अनुराग कश्यपने आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

काय म्हणाला अनुराग...?
गुरूवारी अनुराग 'ऑल्मोस्ट प्यार विद डीजे मोहब्बत' या आपल्या सिनेमाच्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये पोहोचला. यावेळी त्याने मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, मला वाटतं, पंतप्रधान हेच चार वर्षाआधी बोलले असते तर कदाचित फायदा झाला असता. मला नाही वाटत की आता याचा काही फायदा होईल. आता सगळ्याच गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत. आता मोदींचा हा सल्ला फार कुणी मनावर घेईल असं मला वाटत नाही.   तुम्ही मौन बाळगून पक्षपात आणि द्वेषाला इतकं बळ दिलंय की आता सगळे निर्ढावलेत.

अलीकडच्या काळात बॉलिवूडचे अनेक सिनेमे बायकॉट ट्रेंडचे बळी ठरलेत. बॉलिवूडला यामुळे मोठं नुकसान सहन करावं लागलं. शाहरूखच्या पठाण या सिनमोचा वाद याचं ताजं उदाहरण. ‘बेशरम रंग’ गाण्यावर वाद झाल्यानंतर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, भाजपाचे राम कदम यांनी आक्षेप घेतला होता. ‘पठाण’ चित्रपट मध्य प्रदेशमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही मिश्रा यांनी दिला होता.

Web Title: anurag kashyap on pm narendra modi politicians commenting on bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.