‘सत्या’चा हा सीन शूट करताना ‘भिकू म्हात्रे’ला फुटला होता घाम, अनुराग कश्यपने पकडून ठेवले होते पाय!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 08:00 AM2022-04-23T08:00:00+5:302022-04-22T18:26:44+5:30

Manoj Bajpayee in Satya: ‘सत्या’ या चित्रपटातत मनोज वाजपेयीनं साकारलेली ‘भिकू म्हात्रे’ची भूमिका इतकी अपार गाजली की आजही ‘भिकू म्हात्रे’ म्हटलं की मनोज वाजपेयीचा चेहरा चटकन डोळ्यांपुढे येतो.

Anurag Kashyap recalls Manoj Bajpayee's fear of heights during Satya | ‘सत्या’चा हा सीन शूट करताना ‘भिकू म्हात्रे’ला फुटला होता घाम, अनुराग कश्यपने पकडून ठेवले होते पाय!!

‘सत्या’चा हा सीन शूट करताना ‘भिकू म्हात्रे’ला फुटला होता घाम, अनुराग कश्यपने पकडून ठेवले होते पाय!!

googlenewsNext

1990 नंतर बॉलिवूड रोमॅन्टिक सिनेमात रमलं असताना, बॉलिवूडमध्ये आमिर, शाहरूख, सलमानची चलती असताना ‘बँडीट क्वीन’ हा सिनेमा आला. या चित्रपटानं बॉलिवूडच्या रोमँटिसीझमच्या कल्पना मोडीत काढल्या. याच चित्रपटातलाच एक चेहरा होता मनोज वाजपेयीचा (Manoj Bajpayee). सिनेमा संपला आणि मनोज वाजपेयीला अनेक महिने कामचं मिळेना. योगायोगानं तो राम गोपाल वर्मांना भेटला आणि रामूला त्याचा ‘भिकू म्हात्रे’ भेटला. ‘सत्या’  (Satya ) या चित्रपटातत मनोज वाजपेयीनं साकारलेली ‘भिकू म्हात्रे’ची भूमिका इतकी अपार गाजली की आजही ‘भिकू म्हात्रे’ म्हटलं की मनोज वाजपेयीचा चेहरा चटकन डोळ्यांपुढे येतो.

आता हा भिकू म्हात्रे आठवण्याचं कारण काय तर एक सीन. होय, ‘सत्या’ पाहिला असेल तर एक सीन तुम्हाला हमखास आठवेल. मुंबई का किंग कौन? असं डोंगराच्या काठावर उभा होऊन मनोज वाजपेयी विचारतो. या आयकॉनिक सीनमागची स्टोरी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ऐकून आश्चर्य वाटेल पण या सीनमध्ये मनोज वाजपेयी एकटा नव्हता तर त्याच्यासोबत अनुराग कश्यपही (Anurag Kashyap) होता. हा अख्खा सीन शूट होत असताना अनुराग कश्यपने मनोज वाजपेयीचे पाय  करकचून पकडून ठेवले होते. विश्वास नाही ना बसला? कारण सीनमध्ये अनुराग कश्यप कुठेही दिसत नाही. तर हीच या सीनमागची खरी स्टोरी आहे.

1998 ‘सत्या’ हा सिनेमा राम गोपाल वर्मा यांनी दिग्दर्शित केला होता. सौरभ शुक्ला व अनुराग कश्यप यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली होती. त्यामुळे शूटींगकाळात अनुराग कश्यप सेटवर हजर होता. 

चित्रपटातील मनोज वाजपेयीचा एक सीन उंच पहाडावर शूट होणार होता. पण एक मोठ्ठी अडचण होती. मनोज वाजपेयीच्या मनात उंचीची प्रचंड भीती होती. उंच पहाडावर सीन द्यायचा म्हटल्यावर त्याची बोबडी वळली होती. अनुरागची परिस्थितीही वेगळी नव्हती. पण सीन शूट करायचा होता. मग एक शक्कल लढवली गेली. मनोज वाजपेयीचा हा सीन पूर्ण होईपर्यंत अनुरागने जमिनीवर लेटून त्याचे पाय गच्च पकडून ठेवले. अगदी सीन शूट होईपर्यंत तो मनोजचे पाय पकडून होता. मग सीनमध्ये अनुराग कश्यप का दिसत नाही? असा प्रश्न तुम्ही विचाराल. याचं कारण म्हणजे, तो इनव्हिजिबल होता.

Web Title: Anurag Kashyap recalls Manoj Bajpayee's fear of heights during Satya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.