Anurag Kashyap On Sushant Singh Rajput: “मृत्यूच्या तीन आठवड्यांआधी सुशांतने मला...”, अनुराग कश्यपला आता होतोय पश्चाताप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 04:34 PM2023-01-29T16:34:36+5:302023-01-29T16:35:58+5:30

Anurag Kashyap On Sushant Singh Rajput: सुशांतच्या निधनाला दोन वर्षांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. पण आजही चाहते त्याच्या आठवणीत हळवे होतात. अशात आता अनुराग कश्यपने सुशांतबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

Anurag Kashyap says he gets guilt for ignoring Sushant Singh rajput | Anurag Kashyap On Sushant Singh Rajput: “मृत्यूच्या तीन आठवड्यांआधी सुशांतने मला...”, अनुराग कश्यपला आता होतोय पश्चाताप

Anurag Kashyap On Sushant Singh Rajput: “मृत्यूच्या तीन आठवड्यांआधी सुशांतने मला...”, अनुराग कश्यपला आता होतोय पश्चाताप

googlenewsNext

Anurag Kashyap On Sushant Singh Rajput: अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) आज आपल्यात नाही. १४ जून २०२० रोजी सुशांतने त्याच्या राहत्या घरी कथितरित्या गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या निधनाला  दोन वर्षांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. पण आजही चाहते त्याच्या आठवणीत हळवे होतात. अशात आता बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने (Anurag Kashyap ) एका ताज्या मुलाखतीत सुशांतबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.. त्याचा खुलासा ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मृत्यूच्या तीन आठवड्यांआधी सुशांतने माझ्याशी बोलण्याचा, मला भेटण्याचा प्रयत्न केला होता. पण मी त्याला नकार दिला, असं अनुराग यावेळी म्हणाला.


 
काय म्हणाला अनुराग...?
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनुराग सुशांतबाबत बोलला. तो म्हणाला, “सुशांतच्या मृत्यूची बातमी ऐकून मला प्रचंड वाईट वाटलं होतं. कारण मृत्यूच्या तीन आठवड्यांपूर्वीच माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. त्याला काम हवं होतं. पण मी त्याच्याशी बोलण्यास नकार दिला होता. मला आजही याचा पश्चाताप होतो. मी खूप लवकर रिॲक्ट होतो. रागात नको ते बोलून देतो. पण हे सगळं कळायला मला दीड वर्ष लागलं. मी आता बदललो आहे, मला समजलं आहे की प्रत्येक गोष्ट बोलून दाखवण्याची गरज नसते.”

यामुळे अनुराग सुशांतवर होता नाराज...
२०२० मध्ये एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अनुराग सुशांतबद्दल बोलला होता. यशराजसोबत काम करण्यासाठी सुशांतने माझा सिनेमा सोडला, असा खुलासा अनुरागने केला होता. तो म्हणाला होता की, सुशांतने यशराज फिल्मचा शुद्ध देसी रोमान्स साईन केला आणि हंसी तो फंसी सोडला. अर्थात माझ्या मनात याबद्दल कोणतीही तक्रार नाही. २०१६ मध्ये एम एस धोनी रिलीज होण्याआधी मुकेश छाब्राने सुशांतला माझ्या चित्रपटाबद्दल विचारलं होतं. अनुरागने एक स्क्रिप्ट लिहिली आहे आणि त्याला एका अभिनेत्याचा शोध आहे, असं मुकेशने सुशांतला सांगितलं होतं. पण एम एस धोनी हिट झाला आणि त्यानंतर सुशांतने मला कॉलच केला नाही.
 

Web Title: Anurag Kashyap says he gets guilt for ignoring Sushant Singh rajput

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.