अनुराग कश्यपने सांगितलं सुशांतसोबत काम न करण्याचं कारण, शेअर केलं मॅनेजरसोबतचं चॅटींग...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 12:25 PM2020-09-09T12:25:39+5:302020-09-09T12:30:43+5:30
हे चॅटींग सुशांत सिंह राजपूतच्या मॅनेजरसोबतचं असल्याचं अनुरागने सांगितलं. यातून अनुरागने स्पष्ट केलं की, त्याला दिवंगत सुशांतसोबत काम का करायचं नव्हतं.
सुशांत सिंह राज केसचा तपास सीबीआय करत आहे. दरम्यान एनसीबीने रिया चक्रवर्तीला ड्रग्स खरेदी केल्याच्या आरोपाखाली अटक केली. आता तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अशात रियाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींचा सपोर्ट मिळत आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने ट्विटरवर एक व्हॉट्सअॅप चॅट शेअर केलं आहे. हे चॅटींग सुशांत सिंह राजपूतच्या मॅनेजरसोबतचं असल्याचं अनुरागने सांगितलं. यातून अनुरागने स्पष्ट केलं की, त्याला दिवंगत सुशांतसोबत काम का करायचं नव्हतं.
अनुराग कश्यपने सुशांत सिंह राजपूतच्या मॅनेजरसोबतचं व्हॉट्सअॅप चॅटींग शेअर करत लिहिले की, 'मला माफ करा, मला हे करावं लागत आहे. पण हे चॅटींग सुशांतच्या निधनाच्या तीन आठवड्यांपूर्वीचं आहे. त्याच्या मॅनेजरसोबत २२ मे रोजी हे चॅट झालं. आतापर्यंत हे शेअर करण्याची गरज पडली नव्हती. पण आता वाटलं हे शेअर करावं. हो...मला त्याच्यासोबत काम करायचं नव्हतं. आणि याची माझी काही कारणे होती'.
I am sorry that I am doing this but this chat is from three weeks before he passed away. Chat with his manager on 22 May .. havent don’t it so far but feel the need now .. yes I didn’t want to work with him for my own reasons .. https://t.co/g4fLmI5g9hpic.twitter.com/cHSqRhW9BD
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) September 9, 2020
यात सुशांतचा मॅनेजर अनुरागला म्हणाला की, 'आशा आहे तुम्ही ठीक असाल'.
अनुराग - हो...
अनुराग - तुम्ही ठीक आहात?
मॅनेजर - होय, मी होम टाउनला आहे. इथे शेती सुरू केली आणि फार आनंदी आहे. शेतीचा वापर होत आहे. मला माहीत आहे की, तुम्हाला असे लोक आवडत नाही जे कलाकारांची शिफारीश करतात. मला वाटतं हा चान्स माझ्या माध्यमातून घेतला जाऊ शकतो...जर तुम्हाला वाटलं की, सुशांत कशाप्रकारेही तुमच्यासोबत एखाद्या सिनेमा फिट बसत असेल तर लक्ष ठेवा. ऑडिअन्सला विचारात ठेवून तुम्हा दोघांना काही रचनात्मक करताना बघण्यात मजा येईल.
अनुराग - तो फार परेशान करणारा माणूस आहे. मी त्याला सुरूवातीपासून ओळखतो...
हे पण वाचा :
आम्ही तितके मूर्ख नाही...! रियाच्या बाजूने मैदानात उतरणा-यांना सुशांतच्या बहिणीने सुनावले
सुशांत जिवंत असता तर तुरूंगात असता का? रियाच्या कबूलनाम्यावर तापसी पन्नूचा प्रश्न