अनुराग कश्यप, वरूण ग्रोव्हर, कुणाल कामरा पुरस्कारांचा करणार लिलाव, कोरोनाच्या टेस्ट किटसाठी उभारणार फंड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 11:41 AM2020-05-21T11:41:26+5:302020-05-21T11:42:54+5:30
बोली लावा अन् फिल्मफेअर, युट्युब बटण जिंका!
कोरोना महामारीने जगाला आर्थिक संकटात लोटले आहे. भारतही आर्थिक संकटातून जातोय. अशास्थितीत अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. आता या यादीत दिग्दर्शक अनुराग कश्यप याचेही नाव समाविष्ट झाले आहे. कोव्हिडी-19 टेस्ट किटसाठी निधी उभा करण्याचे काम अनुरागने हाती घेतले आहे आणि यासाठी तो स्वत:च्या फिल्मफेअर बाहुलीचा लिलाव करणार आहे.
अनुरागसोबत कॉमेडियन कुणाल कामरा आणि वरूण ग्रोव्हर हेही स्वत:चे युट्यूब बटन आणि ट्रॉफीचा लिलाव करणार आहेत. येत्या 30 दिवसांत 13,44,000 रूपयांचा निधी गोळा करण्याचे या सर्वांचे लक्ष्य आहे. या पैशातून हे लोक टेस्ट किट्स खरेदी करतील. यातून लोकांच्या टेस्ट केल्या जातील.
अनुराग कश्यपने ट्विटरवर याबद्दलची घोषणा केली. जो सर्वाधिक बोली लावणार त्याला माझी फिल्मफेअर ट्रॉफी मिळेल, असे त्याने सांगितले. अनुरागने 2013 मध्ये ‘गँग आॅफ वासेपूर’ या सिनेमासाठी फिल्मफेअर अवार्ड जिंकला होता.
Adding the TOIFA trophy I won for 'Moh Moh Ke Dhaage' (DLKH, 2015) for charity auction to raise funds for Covid test kits.
— वरुण 🇮🇳 (@varungrover) May 20, 2020
Putting it up on ebay in 2050 was my retirement fund plan but i believe now is a better time to use it to secure India's future. https://t.co/t0Q6YJMCkghttps://t.co/2xqDEakmKApic.twitter.com/hu6Yig2G7p
वरूण ग्रोव्हर यानेही त्याने जिंकलेल्या ट्रॉफीचा फोटो शेअर करत याबद्दलची घोषणा केली. वरूणला ‘मोह मोह के धागे’ या गाण्यासाठी या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. ‘2050 सली ही ट्रॉफी ebay वर टाकून मी माझ्या वृद्धापकाळासाठी पैसा गोळा करू शकलो असतो. पण सध्या भारत वाचवण्याची वेळ आहे. त्यामुळे पैसे उभारण्यासाठी मी या ट्रॉफीचा वापर करणार आहे,’ असे वरूणने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.
Donation link - https://t.co/xm5mNd2qDZpic.twitter.com/1PxsZRqyy8
— Kunal Kamra (@kunalkamra88) May 20, 2020
दुसरीकडे कुणाल कामराने त्याचे युट्यूब बटण लिलावात काढण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांच्या संख्येने कधीच एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या देशात सर्वाधिक आहे.