अनुराग म्हणतो, रणबीरच्या अपयशासाठी मीच जबाबदार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2016 02:27 PM2016-09-11T14:27:37+5:302016-09-11T19:57:37+5:30
‘बॉम्बे वेल्वेट’ बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला आणि या अपयशाचा सर्वाधिक फटका बसला तो रणबीर कपूरला. पण ‘बॉम्बे वेल्वेट’चे दिग्दर्शक अनुराग ...
‘ ॉम्बे वेल्वेट’ बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला आणि या अपयशाचा सर्वाधिक फटका बसला तो रणबीर कपूरला. पण ‘बॉम्बे वेल्वेट’चे दिग्दर्शक अनुराग कश्यपला याची जाणीव आहे. ती नसती तर रणबीरच्या अपयशाला मीच जबाबदार आहे, असे अनुराग म्हणाला नसता. अनुरागचा ‘बॉम्बे वेल्वेट’आणि अनुरागचा भाऊ अभिनव कश्यप याच्या ‘बेशरम’ या दोन्ही चित्रपटांनी रणबीरच्या झोळीत अपयशच टाकले. अनुराग यांनी याची प्रांजळ कबुली दिली आहे. ‘बॉम्बे वेल्वेट’ आणि ‘बेशरम’या दोन्ही चित्रपटांना मिळालेल्या अपयशामुळे रणबीरच्या करिअरवर परिणाम झाला . यासाठी मी स्वत:ला जबाबदार मानतो, हे अनुरागने मोठ्या मनाने मान्य केले. माझ्या मते, रणबीर एक उत्तम अभिनेता आहे. पण त्याच्या करिअरच्या घसरत्या आलेखासाठी आम्हीच जबाबदार आहोत. पण असे असले तरी माझ्या व रणबीरच्या मैत्रीपूर्ण संबंधांवर त्याचा तसूभरही परिणाम झालेला नाही. रणबीरसोबत सध्या कुठलाही चित्रपट साईन केलेला नाही. रणबीर स्वत: त्याच्या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. पण भविष्यात त्याच्यासोबत काम करण्यास मी उत्सूक आहे, असेही अनुराग म्हणाला.