२२ वर्षीय अभिनेत्रीला कोरियन सरकारकडून मिळाला पुरस्कार, कारणही आहे खास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 02:38 PM2024-09-22T14:38:50+5:302024-09-22T14:39:20+5:30

ती लिहिते, 'मी तुमच्या सर्वांसोबत हा खास क्षण शेअर करण्यासाठी उत्सुक आहे.'

Anushka Sen 22 year old actress got an award from korean government | २२ वर्षीय अभिनेत्रीला कोरियन सरकारकडून मिळाला पुरस्कार, कारणही आहे खास

२२ वर्षीय अभिनेत्रीला कोरियन सरकारकडून मिळाला पुरस्कार, कारणही आहे खास

अभिनेत्री अनुष्का सेनला  (Anushka Sen) कोरिया आणि भारतातील नातं घट्ट करण्यासाठी एक प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला. एवढ्या कमी वयात तिने हा पुरस्कार पटकावला आहे. ऑनररी एम्बेसिडर ऑफ कोरियन टूरिजमच्या रुपात अनुष्काने कोरिया आणि भारतातील सांस्कृतिक अंतर कमी करण्यासाठी मोठी भूमिका पार पाडली आहे. यासाठीच तिला ही ग्लोबल ओळख मिळाली.

अनुष्का सेनने यासंदर्भात पोस्ट करत लिहिले, "मी तुमच्या सर्वांसोबत हा खास क्षण शेअर करण्यासाठी उत्सुक आहे. कोरिया आणि भारत यांच्या नातं घट्ट होण्यासाठी मी केलेल्या प्रयत्नांसाठी मला सियोल बिझनेस एजंसीचे सीईओ मिस्टर ह्यून वू किम यांच्याकडून पुरस्कार प्राप्त करण्याचा सम्मान मिळाला. मी आशिया डायरेक्टर ली जंग यांची आभारी आहे. के ड्रामामध्ये काम करणं माझं स्वप्न होतं. कोरिया टूरिज्म ऑर्गनायझेशनची ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त होणं आणि भारत-कोरिया यांच्यातील संबंध घट्ट करणं यासाठी मी केलेल्या योगदानाची दखल घेतली गेली हे नक्कीच मला आणखी चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहन देणारं आहे."


याआधी अनुष्का सेन कोरियाच्या बिलबोर्डवर झळकलेली पहिली भारतीय होती. वयाच्या केवळ २२ व्या वर्षी तिने टॅलेंट आणि मेहतनीच्या जोरावर हे यश मिळवलं. नुकतीच ती 'दिल दोस्ती डिलेमा' सीरिजमध्ये दिसली. आता ती आगामी 'एशिया' या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे.

Web Title: Anushka Sen 22 year old actress got an award from korean government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.