अनुष्का शर्मा व वरूण धवन सांगत आहेत लोगो तयार करणाऱ्या लोकांची कथा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 12:46 PM2018-08-21T12:46:06+5:302018-08-21T12:51:28+5:30
अभिनेत्री अनुष्का शर्मा व अभिनेता वरूण धवन यांचा आगामी चित्रपट 'सुई धागा' सिनेमा २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
अभिनेत्री अनुष्का शर्मा व अभिनेता वरूण धवन यांचा आगामी चित्रपट सुई धागाच्या प्रदर्शनाची वाट त्यांचे चाहते पाहत आहेत. हा सिनेमा २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. सध्या हे दोघे या सिनेमाचे अनोख्या अंदाजात प्रमोशन करत आहेत. देशातील वेगवेगळ्या आर्ट फॉर्म्समधून सुई धागाचा लोगो तयार करण्यात आला होता. आता दोघेही त्याच कलाकारांची कथा घेऊन आले आहेत. वरूण व अनुष्काने आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात ते गुजरातच्या पाबीबेनची कथा सांगत आहेत.
अनुष्का शर्मा व वरूण धवनने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये रॉबरी आर्ट फॉर्म आणि ते चालवत असलेल्या पाबीबेनची कथा सांगण्यात आली आहे. कच्छच्या या आर्ट फॉर्ममधून गावातील महिला स्वावलंबी बनल्या आहेत. यासोबतच पाबीबेनने आपल्या वेबसाइटच्या माध्यमातून हे काम जगभरात प्रसिद्ध केले. या चित्रपटाचा प्रमोशनल व्हिडिओ मेड इन इंडियाला पाठिंबा देतो. तर मेक इन इंडिया कॉन्सेप्टच्या माध्यमातून गुप्त कलाकारांना शोधून काढत आहे.
From an artist to an entrepreneur. Pabiben took the threads of tradition and weaved a successful tale, inspiring so many of us, including me! It’s never as easy as it seems, unless you have a ‘never give up’ spirit like her. #HeroesMadeInIndia@yrf | https://t.co/afyBaygQJH
— Varun MAUJI Dhawan (@Varun_dvn) August 20, 2018
'सुई धागा - मेड इन इंडिया' च्या लोगोसाठी सुई धाग्याच्या माध्यमातून एम्ब्रॉयडरी करणाऱ्या लोकांची शोध घेण्यात आला. देशातील विविध भागांमधील 40 गावांतून हे लोक घेण्यात आले. अखेर काश्मिर आर्ट फॉर्म फूल पत्ती, राजस्थान आर्ट फॉर्म आरी बंजारा गोटा पत्ती, असम आर्ट फॉर्म हँडलूम वर्क, तामिळनाडू आर्ट फॉर्म तोडा आणि पंजाब आर्ट फॉर्म फुलकारीच्या माध्यमातून सुई धागाचा लोगो तयार करण्यात आला.
वरूण व अनुष्का सुई धागा चित्रपटाचे प्रमोशन अनोख्या अंदाजात करत आहेत. हे पाहून त्यांचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.